khidrapur
khidrapur esakal
संस्कृती

Mahashivratri 2024 : शंकरांचे मंदिर महाराष्ट्रात अन् नंदी महाराज कर्नाटकात;जाणून घेऊया या मंदिराची अनोखी कथा!

सकाळ डिजिटल टीम

भारत भूमीला पौराणिक महत्त्व आहे. ग्रंथात,पुराणात भारतातील अनेक ठिकाणांचा उल्लेख हा देवांचे निवास्थान म्हणून केला गेला आहे. त्यातीलच एक भगवान महादेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक मंदिर आहे.

जेव्हा आपल्या पतीचा अपमान केला म्हणून माता सतीने अग्नीकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याचवेळी सतीच्या विरहात रागाने लाल झालेले भगवान शंकर कोल्हापुरातल्या शिरोळात येऊन बसले होते. खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी महाराज नाहीत. तर ते या मंदिरापासून दूर कर्नाटकात बसले आहेत. काय होती ती कथा आणि कोणते आहे ते मंदिर हे जाणून घेऊयात.

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते.

जवळपास ९०० वर्ष जुने हे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती 'शिलाहार' राजवटीत १२ व्या शतकात झाली असावी. ११०९ ते ११७८ या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. हे पूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे.

गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.

मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना आहेत. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

आणि कोपलेला महादेव कोपेश्वर झाला  

येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्षाने पतीचा अपमान केला यामुळे चिडलेल्या सतीने त्याच होमाच्या अग्नीकुंडात प्राणांची आहुती दिली. सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर झाला. मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर.    

नंदीचे मंदिर कर्नाटकात

कोणत्याही शंकरांच्या मंदिरात आपल्याला आधी नंदी दिसतो. मगच शंकरांची पिंड दिसते. पण, या मंदिरात असे नाही. येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे, असे माहितीगार सांगतात.

हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे.  लोक असेही म्हणतात की ते केवळ नंदिचे मंदिर असावे. पण, तसे नाही. खिद्रापूर मंदिराच्या बाजूलाच मुख असलेला नंदी इथे आहे. तो कर्नाटकात आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT