Mahashivratri 2023 esakal
संस्कृती

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला सिंदूर, हळद किंवा तुळशीची पानं का अर्पण करत नाहीत?

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर कधीही सिंदूर, हळद किंवा तुळशीची पाने अर्पण केल्या जात नाही

सकाळ ऑनलाईन टीम

Mahashivratri 2023 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाईल. वर्षातील हा दिवस महत्वाच्या दिवसांपैकी एक आहे. मात्र तुम्हाला माहितीये काय महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर कधीही सिंदूर, हळद किंवा तुळशीची पाने अर्पण केल्या जात नाही. त्याचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया. याशिवाय शिवलिंगावर शंखाने जलार्पणही करु नये.

शिवलिंगावर सिंदूर का अर्पण करत नाहीत?

महादेवाच्या पूजेवेळी शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धोतऱ्याचे फूल, श्रीफळ इत्यादी साहित्या अर्पण केले जाते.मात्र सिंदूर कधीच अर्पण केले जात नाही. कारण हिंदू धर्मानुसार सिंदूर स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी लावतात. तर भगवान शिवाचे एक रूप संहारक देखील मानले जाते. त्याच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर सिंदूर अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.

शिवलिंगावर हळद का अर्पण केली जात नाही?

हिंदू धर्मानुसार हळद ही अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानल्या जाते. तरीसुद्धा याचा उपयोग महादेवाच्या पूजेत केला जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग पुरुष तत्वाचं प्रतिक आहे.तर हळीदा संबंध हा स्त्रियांशी असतो. याच कारणाने महादेवाला हळद अर्पण केली जात नाही. केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर इतरवेळीसुद्धा महादेवाला हळद अर्पण केली जात नाही.

शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण करत नाहीत?

पूर्वजन्मात तुळशीचा जम्न हा राक्षस कुळात झाला होता. तिचे नाव वृंदा होते. ती भगवान विष्णूची भक्तीण होती. मात्र तिचा विवाह दानव कुळातील जलंधरशी झाला. जेव्हा त्याचे देवांशी युद्ध झाले त्यावेळी ती पतीच्या यशस्वीतेसाठी अनुष्ठानावर बसली. मात्र महादेवानेच त्याचा वध केला. तिच्या पतीच्या निधनाने दु:खी झालेल्या तुळशीने महादेवाला असा श्राप दिला होता की यानंतर महादेवाच्या पूजेत कधीही तुळशीचा वापर केला जाणार नाही. तेव्हापासून महादेवाच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. (Sanskruti)

याशिवाय शिवलिंगावर जलार्पणही करु नये.

शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करू नये

शंखाचा उपयोग प्रत्येक देवी देवतेच्या पूजेमध्ये केला जातो. मात्र महादेवाच्या पूजेत याचा वापर केला जात नाही. शिवपुराणानुसार, शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा स्वतः महादेवाने वध केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला कधीही शंख वाहून जल अर्पण केले जात नाही. (MAHA SHIV RATRI FESTIVAL)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा

SCROLL FOR NEXT