Mangal Budh Yuti 2025 Five Rashi Will Get Bad Effects 
संस्कृती

Mangal Budh Yuti 2025 : मंगळ बुधाच्या युतीमुळे या 5 राशींचे वाजणार तीन तेरा ! संकटांची रांग आणि आरोग्याच्या अडचणी

Mangal Budh Yuti 2025 : मंगळ आणि बुध ग्रहाच्या या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या युतीमुळे पाच राशींवर संकट येणार आहे. काय होणार भविष्यात जाणून घेऊया.

kimaya narayan

  1. 28 जुलै 2025 रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश केल्याने मंगळ-बुध युती निर्माण होईल.

  2. या शत्रुत्व युतीचा परिणाम आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर दिसू शकतो.

  3. पाच राशींवर या युतीचे विशेषतः अशुभ परिणाम होऊ शकतात.

Marathi Rashifal 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्याच्या अखेरीस मंगळ आणि बुध ग्रहाची अशुभ युती होते आहे. याचे काय परिणाम होणार आणि कोणत्या राशींवर विशेष अशुभ परिणाम दिसणार हे जाणून घेऊया. काही राशींना खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, भूमी आणि विवाहाचा कारक मानलं जातं. 28 जुलै 2025 ला मंगळ ग्रह संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मंगळ आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. मंगळ आणि बुध शत्रू ग्रह आहेत त्यामुळे काही राशींच्या आरोग्य आणि आर्थिक स्थितींवर परिणाम होऊ शकतो.

मिथुन रास :

मंगळ ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असेल. या काळात तुमच्या खर्चात वाढ होईल. पैशांचा विनाकारण खर्च कराल. यामुळे घरात वाद होतील.

तूळ रास :

तूळ राशीसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. या काळात आरोग्यावर परिणाम होईल. तुम्ही मानसिक तणावात असाल. कोणत्याही कामात तुमचं मनं रमणार नाही आणि त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

धनु रास :

धनु राशीसाठी मंगळ आणि बुध ग्रहाची युती करिअरसाठी आव्हानात्मक ठरेल. ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार नाही.

मकर रास :

मकर राशीच्या लोकांनी या काळात सावध राहावे. कोणत्याही कारणासाठी लांबच्या प्रवासाला जाणं टाळा. कामाच्या बाबतीत सतर्क राहा. धीराने काम करा.

मीन रास :

मीन राशीसाठी हा काळ धोकादायक असेल. तुमच्या पार्टनबरोबर तुमचे वाद होतील. व्यवहारात नुकसान होईल. समजुतदारीने व्यवहार करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

FAQs :

1. मंगळ-बुध युती नेमकी कधी होते आहे?
→ 28 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7:58 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल, जिथे बुध आधीच आहे.

2. मंगळ आणि बुध यांची युती अशुभ का मानली जाते?
→ मंगळ आणि बुध शत्रू ग्रह असून त्यांची युती मतभेद, गैरसमज, आर्थिक व आरोग्य अडचणी निर्माण करू शकते.

3. कोणत्या राशींवर सर्वाधिक अशुभ परिणाम होतील?
→ वृश्चिक, मीन, वृषभ आणि कन्या राशींना आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक त्रास संभवतो.

4. या युतीमुळे काय टाळावं?
→ मोठे निर्णय, व्यवहार, प्रवास, गुंतवणूक आणि नवा व्यवसाय सुरू करणं टाळावं.

5. उपाय काय आहेत या युतीचे परिणाम टाळण्यासाठी?
→ हनुमान चालिसा पठण, “ॐ भौमाय नमः” व “ॐ बुधाय नमः” मंत्र जप, आणि तांदूळ, गूळ किंवा मूळ गवत दान करणे लाभदायक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Ajit Pawar : शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

Latest Marathi News Live Update:8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत जाहीर करा – खासदार कल्याण काळे

SCROLL FOR NEXT