Marriage Muhurat
Marriage Muhurat  esakal
संस्कृती

Marriage Muhurta : 28 जूनच्या आतच उरका शुभ मंगल सावधान! पुढचे मुहूर्त लांबणीवर

सकाळ डिजिटल टीम

- अशोक गव्हाणे

Marriage Muhurat : मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरु झाल्यानंतर यंदा पहिला लग्नमूहूर्त हा ३ मे रोजी निघाला आणि लग्नसराईला सुरवात झाली. त्यानंतर लग्नासाठी यंदा २८ जूनचा शेवटचा मुहूर्त आहे. २८ जूननंतर लग्नासाठी मुहूर्त निघत नाही. त्यामुळे वधू वरांना २८ जूनच्या आतच शुभ मंगल सावधान करावे लागणार आहे. २८ जूननंतर आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरवात होते, तो कार्तिकी एकादशीपर्यंत असतो.

त्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये विवाह करु नये असा आपल्याकडे रिवाज आहे. त्यानंतर थेट २५ नोव्हेंबरला विवाहमूहूर्त सुरु होत आहेत. त्यामुळे २८ जूनपर्यंतचा मूहूर्त हुकल्यास लग्नासाठी लोकांना २५ नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर हा शेवटचा मूहूर्त असणार आहे. त्यामुळे यंदा हा मे आणि जून महिन्यात लग्नघाई दिसून येईल.

२०२२च्या तुलनेत नवीन वर्ष २०२३मध्ये लग्नासाठी जास्त शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त संख्येने वधू-वर विवाहबंधनात अडकतील. मे आणि जून महिन्यात लग्नाच्या चांगल्या तारखा असून दोन्ही महिन्यात मिळून जवळपास लग्नाचे १७ शूभमूहूर्त आहेत. यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य म्हणजे मूहूर्त जास्त असल्याने लग्न करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. पर्यायाने लग्न कार्यालये, बँक्वेट हॉल व्यस्त राहतील. तसेच, लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्याचे पाहायला मिळेल. (Wedding Ceremony)

Marriage Muhurat

हे यंदाचे आहेत लग्नमूहूर्त

मे २०२३- ३,४,७,११,१२,२१,२२,२९

जून २०२३-१,३,७,८,१२,१४,२३,२६,२८

नोव्हेंबर २०२३-२५,२९

डिसेंबर २०२३-६,७,८,९,१४,१५,२१,२२,२५,३१ (Muhurta)

गुरु आणि शुक्र हे दोन ग्रह जेव्हा अस्तंगत असतात त्यावेळी व चातुर्मासात विवाहाचे मूहूर्त नसतात. गुरु ग्रहाचा अस्त ३१ मार्च २०२३ ते २९ एप्रिल २०२३ या काळात होता. त्यामुळे चैत्र महिन्यात मूहूर्त निघाले नाहीत अन्यथा आणखी मूहूर्तांच्या तारखांमध्ये वाढ झाली असती. किमान, शुक्र ग्रहाचा अस्त चातुर्मासात आल्यामुळे लग्नाच्या तारखांसाठी दिलासा मिळणार आहे. - गौरव देशपांडे, देशपांडे पंचागकर्ते

अनेकवेळा मूहूर्त नसल्यावर वधू वराच्या पत्रिकांचा अभ्यास करून चांगली तिथी काढून मूहूर्त काढण्यात येतात. त्यानुसार लग्नकार्य करतात. पंरतु, आपल्याकडे मूहूर्ताला अनन्यसाधारण महत्व असल्याने लग्न मूहूर्तावर करण्याचा वधू वरांच्या नातेवाईकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार मूहूर्ताला महत्व आहे - अवधूत इगवे, गुरुजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT