Ashadhi Wari & Rath Yatra: A Beautiful Blend of Faith, Science & Nature sakal
संस्कृती

आषाढी वारी आणि जगन्नाथ रथयात्रा: अध्यात्म, विज्ञान आणि पर्यावरणाचा अनोखा संगम

How barefoot walking in devotional processions impacts health: आषाढी वारी आणि जगन्नाथ यात्रा या धार्मिक परंपरा अध्यात्म, विज्ञान आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम दर्शवतात.

Anushka Tapshalkar

ध्यान गुरु रघुनाथ गुरुजी

(आध्यात्मिक संशोधक)

आषाढ महिन्यात लाखो भक्त पंढरपूरची आषाढी वारी आणि ओडिशामधील जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होतात. या दोन तीर्थयात्रा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, त्यामागे विज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य यांचा अनोखा संगम दडलेला आहे, असा निष्कर्ष विविध संशोधनांद्वारे समोर आला आहे.

पंढरपूरची आषाढी वारी आणि जगन्नाथ यात्रा दोन्ही आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी त्यांच्या शिखरावर पोहोचतात. हा काळ पावसाळ्याचा प्रारंभ असतो. निसर्गात बदल होतो, माती, पाणी आणि हवेमध्ये नवीन ऊर्जा सक्रिय होते. या काळात यात्रा करणं म्हणजे शरीर, मन आणि निसर्ग यांच्यात समरसता निर्माण करणं, असं अनेक संशोधकांचं मत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून वारीचे फायदे

अमेरिकेतील HeartMath Institute च्या संशोधनानुसार, जेव्हा हजारो लोक एकाच दिशेने, एकाच भावनेने चालतात, तेव्हा त्यांच्या हृदयाच्या स्पंदनांमधून एक विशिष्ट ऊर्जा तयार होते. यामुळे समूहामध्ये सकारात्मकता, शांतता आणि समरसता निर्माण होते. याला Group Heart Coherence असे म्हटले जाते.

'How God Changes Your Brain' या पुस्तकात मेंदूशास्त्रज्ञ Dr. Andrew Newberg यांनी सांगितलं आहे की, ठराविक गतीने चालणं मेंदूतील तणावदायक बीटा वेव्ह कमी करतं आणि शांतता देणाऱ्या अल्फा व थीटा वेव्ह वाढवतो. यामुळे चिंता, तणाव कमी होतो आणि शरीरातील हार्मोनल संतुलन सुधारते.

वारीत अनेक भक्त अनवाणी चालतात. यामुळे पायांच्या तळव्यावर असलेले एक्युप्रेशर पॉइंट्स उत्तेजित होतात, जे पचन, किडनी, लिव्हर आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असतात.

पर्यावरणपूरक यात्रा

पंढरपूर वारी आणि रथयात्रा यामध्ये लाखो लोक पायी प्रवास करतात. यामुळे वाहनांच्या वापरात घट होते आणि प्रदूषण कमी होतं. निसर्गाच्या सान्निध्यात चालल्याने वृक्ष, माती, जलस्रोत यांच्याशी थेट संपर्क होतो, ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही सकारात्मक ऊर्जा ग्रहण करतात.

पावसाळ्यात चालणं शरीरासाठी लाभदायक ठरतं, असं आयुर्वेदात आणि WHO च्या काही अभ्यासांत नमूद केलं आहे. यामुळे त्वचेमार्फत जलतत्त्व शोषले जातं आणि लिंफॅटिक सिस्टीम सक्रिय होते. तसेच याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यात मदत होते.

प्राचीन ग्रंथांतही उल्लेख

गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्कंद पुराण'मध्ये, पायी तीर्थयात्रा केल्याने पुण्य आणि आरोग्य दोन्ही मिळते असे नमूद केले आहे. तर 'चरक संहिते'नुसार, ऋतू बदलाच्या काळात चालणं वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखतं. आणि नाथ संप्रदाय आणि वारी परंपरेत पदयात्रेला चित्तशुद्धी, देहशुद्धी आणि लोकशुद्धी असे मानलं जातं.

संशोधन काय सांगतं?

आषाढी वारी आणि जगन्नाथ यात्रेवर काही वैज्ञानिक आणि संस्थांनी केलेले अभ्यास असे सांगतात:

Dr. Herbert Benson (Harvard) यांच्या मते, चालणं शरीरात शांतता निर्माण करतं आणि तणाव कमी करतं.

HeartMath Institute (USA) च्या संशोधनानुसार, सामूहिक चालणं सकारात्मक ऊर्जा तयार करतं.

Dr. B.M. Hegde यांच्या मते, श्रद्धेने चालणं हे औषधासारखं कार्य करतं.

IIT- खरगपूरच्या 2018 मधील अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, रथ यात्रेदरम्यान सामूहिक चालणं ‘जिओ-सायकॉलॉजिकल स्पंदन’ निर्माण करतं, ज्याचा मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : गुंड नीलेश घायवळसह कुटुंबीयांची बँकखाती गोठवली; १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये केले फ्रिज

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा घसरली ! मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दांत टीका

Who is Amanjot Kaur: भारताची फलंदाजी ढेपाळलीच होती, पण अमनजोतने मदतीला धावली; World Cup 2025 मध्ये ठोकलं पहिलं अर्धशतक

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

Latest Marathi News Live Update: दोन महिन्याच्या बाळाला पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी काढले बाहेर

SCROLL FOR NEXT