Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा लक्ष्मीचा फोटो, धनसंपत्तीने भरेल घर

धनसंपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वास्तूशास्त्रात काही टिप्स दिल्या आहेत. त्यांचं पालन केल्याने घरात धनसंपत्ती नांदते.

सकाळ डिजिटल टीम

Mata Lakshmi Photo Vastu Tips : हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवी मानलं गेलं आहे. लक्ष्मीची कृपा झाली तर माणसाला अपार सुख-समृध्दी आणि धनाची प्राप्ती होते असं मानलं जातं. वास्तूशास्त्रात देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरात देवीचा फोटो किंवा मुर्ती ठेवणे हा आहे. पण ते नक्की कोणत्या दिशेला ठेवावं हे पण महत्वाचं आहे.

देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवण्याचे वास्तू नियम

वास्तूशास्त्रानुसार कधीही दक्षिण दिशेला लक्ष्मीचा फोटो लावू नये. असं केल्याने घरात गरिबी येते. आणि साठवलेला पैसाही जातो.

उभ्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवू नये. नेहमी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो ठेवावा.

घरात ठेवायला सगळ्यात शुभ फोटो किंवा मूर्ती तिच ज्यात लक्ष्मी देवी कमळाच्या फुलावर बसून धन वर्षाव करत असेल आणि सोबत दोन हत्ती असतील.

हा फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी सगळ्यात शुभ दिशा उत्तर समजली जाते. त्यामुळे घरात सुख, समृध्दी, धन, धान्य आणि वैभव येतं असं मानलं जातं.

याशिवाय ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर- पूर्व दिशेच्या मधला कोपरा. इथे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात. यात देवीचं मुख असं ठेवा की तुमच तोंड उत्तरेकडे होईल.

देवीची मूर्ती एकतर धातूची किंवा मातीची असावी. प्लास्टिक किंवा पीओपीची नसावी.

कधीही देवीची खंडीत मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये. यामुळे घरात समस्या वाढतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT