Maa Lakshmi Upay
Maa Lakshmi Upay esakal
संस्कृती

Maa Lakshmi Upay : मेहनत करूनही कमाई वाढत नाहीये, मग घरी आणा या 4 गोष्टी, होईल मातेची कृपा अन् धनवर्षाव

सकाळ ऑनलाईन टीम

Maa Lakshmi Upay : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले गेले आहे. असे म्हणतात की ज्या घरामध्ये लक्ष्मी देवी वास करते, त्या कुटुंबाला आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. असे कुटुंब सदैव भरभराटीचे असते. यामुळेच सर्वजण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच 4 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्याने माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी कोणत्या ते.

कमळाचे फूल अर्पण करा

मान्यतेनुसार, कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ती या फुलावर बसते. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण केल्यास तिच्या आशीर्वादाचा वर्षाव संपूर्ण कुटुंबावर होतो. यासोबतच घरात सुख-समृद्धीचा प्रवाहही वाढतो.

घरात झाडू ठेवा

झाडू घरातील घाण काढून टाकतो आणि स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात झाडू असतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. तथापि, लक्षात ठेवा की रात्री कधीही झाडू नका आणि अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका.

तुळस लावा

तुळशीला हिंंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पतीचा दर्जा आहे. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा आश्रय हवा असेल तर आजच तुळशीचे रोप लावा. रोज संध्याकाळी दिवा लावून त्याची पूजा करावी.

घरातील मंदिरात शंख ठेवा

मान्यतेनुसार, जेव्हा समुद्रमंथन होत होते, तेव्हा माता लक्ष्मी आणि शंख एकत्र जन्माला आले होते. या संदर्भात, शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. ज्या घरामध्ये शंख असतो त्या घरापासून माता लक्ष्मी दूर जाऊ शकत नाही असे म्हणतात. (astrology)

(डिस्क्लेमर - वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT