Meaning of Dreams Sakal
संस्कृती

Meaning of Dreams : स्वप्नात साप दिसत असेल तर हलक्यात घेऊ नका; स्वप्नशास्त्रानुसार अर्थ जाणून घ्या...

काही स्वप्नं येणाऱ्या वाईट दिवसांचे सूचक असतात, तर काही स्वप्ने अशी असतात, की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे.

वैष्णवी कारंजकर

प्रत्येक व्यक्ती झोपेत नक्कीच स्वप्न पाहतो. काही लोक त्यांची स्वप्ने विसरतात तर काहींची अशी स्वप्नं असतात जी दिवसभर त्यांच्या मनात राहतात. अशा स्वप्नांचा अर्थ शास्त्रात दिला आहे. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे एक खास चिन्ह लपलेलं असतं.

काही स्वप्नं येणाऱ्या वाईट दिवसांचे सूचक असतात, तर काही स्वप्ने अशी असतात, की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसत असेल तर ते सामान्य स्वप्न नसून त्यामागे एक विशेष सूचक दडलेले असते. चला जाणून घेऊया स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसण्याचा अर्थ काय आहे?

काळा साप दिसणे

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार काळा साप दिसत असेल तर हे स्वप्न एक वाईट सूचक आहे. स्वप्न शास्त्रानुसार, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसात पैशाशी संबंधित नुकसान होणार आहे किंवा तुम्हाला काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

मेलेला साप दिसणे

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुमच्या स्वप्नामध्ये मेलेला साप येत असेल, तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये राहू दोष आहे. या राहू दोषांचं निवारण करण्यासाठी ज्योतिषांच्या मार्गदर्शनाने उपाय करायला हवेत.

मोठ्या प्रमाणावर साप दिसणे

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सापांचा कळप किंवा अनेक साप एकत्र दिसले तर ते अशुभ स्वप्न आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात काही मोठे संकट येणार आहे.

सापांना मारणे

जर तुम्ही स्वप्नात साप मारत असाल तर ते शुभ संकेत आहे. स्वप्न शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवणार आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT