Meaning of Dreams Sakal
संस्कृती

Meaning of Dreams : काळे ढग, कावळा, रक्त...; स्वप्नात दिसणाऱ्या या छोट्या गोष्टींचे गंभीर अर्थ जाणून घ्या...

चला जाणून घेऊया स्वप्नात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सावध करतात.

वैष्णवी कारंजकर

स्वप्न पाहणं ही एक सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येकजण झोपताना स्वप्नं पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. म्हणजेच, झोपताना दिसणारी स्वप्नं तुम्हाला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट भविष्याचे संकेत देतात.

जिथे काही स्वप्नं खूप शुभ मानली जातात, तर काही स्वप्ने अशुभ असतात आणि काही अप्रिय गोष्टींचे संकेत देतात. अशा परिस्थितीत, आपण आधी थोडं सावध असणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया स्वप्नात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सावध करतात. (Astro News)

बैलगाडी

जर एखाद्या व्यक्तीला झोपताना स्वप्नात बैलगाडी दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. हे स्वप्न सूचित करते की आगामी काळात तुम्हाला मोठं यश मिळणार आहे.

काळे ढग

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात काळे ढग दिसणे अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही अडथळे येणार आहेत ज्यामुळे तुम्हाला दुःखाचा सामना करावा लागू शकतो.

कावळा

काही लोकांना त्यांच्या स्वप्नात काळा कावळा दिसतो आणि स्वप्न शास्त्रानुसार हे अशुभ स्वप्न आहे आणि याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात काही मोठी दुर्घटना घडणार आहे. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी मिळू शकते.

रक्तस्राव

जर तुम्हाला स्वप्नात रक्तस्त्राव दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. स्वप्न शास्त्रानुसार, हे स्वप्न दीर्घ आजाराचे संकेत देते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला दीर्घ आजाराला सामोरे जावे लागेल.

वादळ किंवा घर कोसळणे

एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वादळ किंवा घर कोसळताना दिसले तर तेही अशुभ स्वप्नच असते. स्वप्न शास्त्रानुसार, हे स्वप्न तुमचे भाग्य दुर्दैवात बदलणार असल्याचं सूचित करतं.

(ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT