Nag Panchami in Battis Shirala Village  सकाळ डिजिटल टीम
संस्कृती

Nag Panchami 2022: बत्तीस शिराळा गावातल्या नागपंचमीचा रंजक इतिहास माहितीये का ?

नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक एक महिना अगोदर येथील नाग मंडळे स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे.

सकाळ डिजिटल टीम

Nag Panchami 2022: महाराष्ट्रात नागपंचमीचा (Nag Panchami) उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमी म्हटलं की 'बत्तीस शिराळा' (Battis Shirala) या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सांगलीपासून (Sangli) 60 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. हा गावात ख-या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची. मात्र सध्या शासनाच्या नियमांमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते. याआधी नागांना पकडून त्यांची नीट पाहुणाचार करून त्याची पूजा केली जायची. स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. त्यामुळे या सणादिवशी बत्तीस शिराळा गावात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळायचा.

जाणून घेऊया बत्तीस शिराळा गावाविषयी आणि तेथे साजरी होणा-या नागपंचमी सणाविषयी:

1. पहिले या गावाचे नाव "श्रीयालय" असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.

2. या गावापासून जवळच चांदोली अभयारण्य आणि धरण आहे.

3. नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक एक महिना अगोदर येथील नाग मंडळे स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5-6 तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे. पकडलेला नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्यप्रकारे काळजी घेतली जाई.

4. त्यांचा छान पाहुणचार करुन नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे 100-125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई.

5. त्यानंतर मग नागाचे खेळ आयोजित केले जात.खेेळामध्ये उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत.

6) मात्र अशा खेेळाच्या पध्दतीमुुळे सापांचे, नागांचे प्रचंड हाल व्हायचे. हे पाहून निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार 2012 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. मात्र यामुळे या गावातील परंपरेत कोणताही खंड पडला नाही. हे लोक त्यानंतर नागाची प्रतिकात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढू लागले. हा उत्सव आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT