Snake Lovers Urge People to Not Feed Snakes Milk  sakal
संस्कृती

Nag Panchami 2025: दूध पिल्याने साप पडतात आजारी; सर्पमित्रांचे नागरिकांना आवाहन

Why Feeding Milk to Snakes is Harmful: नागपंचमीच्या निमित्ताने सर्पमित्रांनी दूध पाजू नये असे आवाहन करत सापांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना सांगितले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Snake Lovers Urge Eco-Friendly Nag Panchami Celebrations: सर्गिक जैवविविधतेत सापांचे महत्व अन्नन्यसाधारण आहे. त्यात श्रावण महिन्यात वातावरणात बदल होतो. त्यामुळे सर्वाधिक साप आढळून येतात. त्यानुसार नागपंचमीला सापांची पूजा केली जाते. त्याला दूध पाजले जाते, परंतु साप कधीही दूध पित नसून ही केवळ अंधश्रध्दा आहे. दुधामुळे साप अशक्त होवून आजारी पडतात, किंबहूना त्याचा संभाव्य मृत्यूदेखील होवू शकतो. त्यामुळे नागपंचमीला नागाला किंवा सापला दूध पाजू नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये नागाला देवाचे स्थान दिले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी नागांची पूजा करतात. यामध्ये अनेक पौराणिक कथा आहेत. नागाची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात व तो कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही. साप हा बेंडूक,उंदिर, कीटकपक्षांची अंडी व अन्य छोटे सरपटणारे प्राणी खाऊन उदरनिर्वाह करतात.

निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे विशेष महत्व आहे. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र संबोधला जातो. याशिवाय तालुक्यात आढळणाऱ्या सापांपैकी केवळ चार ते पाच प्रजातीचे साप हे विषारी आहेत. त्यामुळे त्यांना मारु नका. सर्पमित्रांशी संपर्क साधा, असे अहे आवाहनही सर्पमित्रांनी केले आहे. साप दिसल्यास त्याला न मारता तत्काळ सर्पमिञांना संपर्क साधून सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणेच योग ठरते.

साप दूध पित नाहीत. दूध दिल्यास ते आजारी पडतात आणि अनेकदा मरतात. ही अंधश्रद्धा सोडा, आणि सापांना न मारता संरक्षित करा.

सर्पदंशानंतर झाडांची पाने, मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडे न जाता, तात्काळ रुग्णालयात उपचार घेणे हाच जीवन वाचविण्याचा खरा उपाय आहे.

-निलेश विश्वकर्मा, सर्पमित्र, शितलवाडी

साप पकडणे म्हणजे शौर्य नव्हे, तर प्रशिक्षण, संयम आणि सावधगिरीचे काम आहे. हौशी आणि अप्रशिक्षित सर्पमित्रांमुळे जीवाला धोका निर्माण होतो.

-सागर धावडे, सर्पमित्र, रामटेक

देशभरात होतो हजारो सापांचा मृत्यू

सापांप्राती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीला आजही ग्रामीण भागांत शेतशिवारात जाऊन नागाची पूजा केली जाते. तसेच काही ठिकाणी आजही सापाला दूधही पाजले जाते. असे असले तरी समाजात सापांविषयी आजही अनेक गैरसमज दिसून येतात. नागपंचमीला साप दूध पितात, हा एक मोठा गैरसमज आहे. त्यासाठी वन्यजिव प्रेमी सर्पमित्रांकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. नागपंचमीला सांपाना दूध पाजू नये, असे आवाहनही करण्यात येते. मात्र तरीदेखील दरवर्षी नागपंचमीला एकाच दिवशी दूध पाजल्याने देशभरात हजारो सापांचा मृत्यू होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''वाल्मिक कराडचा स्पेशल फोन जेलमध्ये सापडला'', सुरेश धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; म्हणाले...

Video Viral : जय शाह हे क्रिकेटमध्ये कर्तृत्वाने नव्हे, बापाच्या जीवावर आलेत! प्रसिद्ध व्यक्तीचा घणाघात

Navi Mumbai: एपीएमसी बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य; अवजड वाहनचालकांची मोठी कसरत

Crime: 'माझ्यासमोर कपडे बदल'! विकृत बापाची मुलीकडे मागणी, आईनं विरोध केला अन् नको ते घडलं

Nashik News : नाशिकच्या गणेशोत्सवासाठी नवे नियम: मंडप बांधायला 'एक महिना' आधी परवानगी घ्या

SCROLL FOR NEXT