Nag Panchami Puja Vidhi sakal
संस्कृती

Nag Panchami Puja Vidhi: नागपंचमीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेसाठी आवश्यक सामग्री आणि संपूर्ण विधी

Complete list of items needed for Nag Panchami Puja: नागपंचमीला घरच्या घरी पूजा करायची आहे? जाणून घ्या पूजेसाठी आवश्यक साहित्य आणि संपूर्ण विधी.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.

  2. या दिवशी नागदेवतांची पूजा पारंपरिक रीतीने केली जाते.

  3. नागपंचमीला पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि सुख-शांती मिळते, अशी श्रद्धा आहे.

Step-by-step Nag Panchami Vidhi in Marathi: श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी एक आणि श्रावणातील सणांची सुरुवात ज्या सणापासून होते तो म्हणजे नागपंचमी सण. या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-शांती प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

यावर्षीची नागपंचमी आज म्हणजेच २९ जुलैला साजरी केली जाणार आहे. आज सकाळी ०६:१४ ते ०८:५१ या वेळेत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. विशेषतः, या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष, ग्रहदोष यापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासाठी पूजेची योग्य तयारी असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या यादीप्रमाणे पूजनासाठी लागणारी सर्व सामग्री आधीच तयार ठेवा

नागपंचमी पूजेसाठी लागणारे साहित्य

नागदेवतेचा फोटो किंवा मूर्ती (मातीची सर्पमूर्ती चालेल), कुशासन, दही, शुद्ध तूप, गंगाजल, पंचामृत (पाच प्रकारचे रस), हळद-कुंकू, गायीचे कच्चे दूध, फुले (ताज्या फुलांचा वापर), पाच फळ (पाच प्रकारची फळे), पंचमेवा (पाच प्रकारचे सुके मेवे), आंब्याची डहाळी, तुळशीचे पान, पंचपक्वान्न,धोतरा, कापूर, धूपबत्ती, अक्षता

नागपंचमीची पूजा कशी करावी?

  1. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.

  2. देवपूजेपूर्वी सूर्यनारायणाला पाणी अर्पण करा.

  3. संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून वातावरण पवित्र करा.

  4. पूजेसाठी घरात एक स्वच्छ चौकट मांडून त्यावर पांढरा किंवा पिवळा स्वच्छ कपडा अंथरावा.

  5. त्यावर नागदेवतेचे चित्र किंवा सर्पमूर्ती स्थापित करा.

  6. नागदेवतेला अक्षता, हळद-कुंकू वाहा.

  7. तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा.

  8. विधीपूर्वक पूजा करून नागदेवतेचा मंत्रजप करा.

  9. नागपंचमी व्रत कथा वाचा किंवा ऐका.

  10. पूजेनंतर नागदेवतांची आरती करा.

FAQs

  1. नागपंचमी का साजरी केली जाते? (Why is Nag Panchami celebrated?)
    नागपंचमी हा सण सर्पदेवतेची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि शांती, समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे.

  2. नागपंचमीला कोणता शुभ मुहूर्त आहे? (What is the auspicious timing for Nag Panchami puja?)
    २०२५ मध्ये नागपंचमी २९ जुलै रोजी असून सकाळी ०६:१४ ते ०८:५१ या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

  3. नागपंचमीच्या दिवशी कोणती पूजेची साहित्य लागते? (What materials are needed for Nag Panchami Puja?)
    नागदेवतेचा फोटो किंवा मूर्ती, गंगाजल, दही, तूप, पंचामृत, हळद-कुंकू, पंचफळ, पंचमेवा, धूप, दीप, तुळशीपत्र, अक्षता, आंब्याची डहाळी इत्यादी साहित्य लागते.

  4. नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी? (How to perform Nag Panchami puja at home?)
    सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, गंगाजल शिंपडून पूजेची जागा शुद्ध करावी, नागदेवतेची मूर्ती बसवून विधीपूर्वक पूजा करावी, मंत्रजप करावा आणि आरती करून व्रत कथा वाचावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kulhad Fight Mathura Video: कुल्हड युद्ध!, मथुरेत लस्सीवाल्यांमध्ये झाली तुंबळ हाणामारी; व्हिडिओ तुफान व्हायरल

NRC Update India : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केली भूमिका!

Swiggy Boy become Deputy Collector : मानलं भावा....! ‘स्विगी’ बॉय बनला थेट डेप्युटी कलेक्टर ; वाचा, सुरजच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या घरी मुंबई पालिका आयुक्तांची भेट, पाऊण तास नेमकी काय चर्चा झाली?

Eknath Khadse : ‘आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र’; हनी ट्रॅपबाबत मौन का? - एकनाथ खडसे यांचा सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT