Nag Panchami Patoli Recipe Marathi sakal
संस्कृती

Nag Panchami 2023 : नागपंचमी स्पेशल - हळदीच्या पानातील पातोळ्याची रेसिपी VIDEO, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदेही

Nag Panchami 2023 - नागपंचमीनिमित्त पातोळ्या (Patoli Recipe Marathi) या गोड पदार्थाचा नैवेद्य तयार करण्याची पारंपरिक परंपरा आहे. जाणून घेऊया या पदार्थांची रेसिपी...

सकाळ डिजिटल टीम

श्रावण म्हणजे सण-उत्सवांचा सण. यानिमित्तानं प्रत्येक घरामध्ये पौष्टिक व पारंपरिक पद्धतीचे भोजनही तयार केले जाते. येत्या २१ ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त पातोळ्या या पारंपरिक गोड पदार्थाचा नैवेद्य तयार करण्याची परंपरा आहे. 

वाफवलेल्या तांदळाचे पीठ, गुळ-खोबरे एकत्रित करून तयार केलेले स्वादिष्ट सारण व हळदीच्या सुगंधीत पानांमध्ये थापलेल्या पातोळ्या म्हणजे खाद्यप्रेमींसाठी एक उत्कृष्ट मेजवानीच…चला तर मग जाणून घेऊया या पातोळ्याची रेसिपी

पातोळ्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • तांदळाचे पीठ - एक कप 

  • हळदीची पाने - 15

  • मीठ - चिमूटभर 

  • किसलेला गूळ - अर्धा कप  

  • वेलचीपूड - चिमूटभर  

  • किसलेले ओले खोबरे - एक कप  

  • तूप - आवश्यकतेनुसार 

पातोळ्या तयार करण्याची रेसिपी

  • एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवा.

  • आता तुपामध्ये किसलेला गूळ वितळवून घ्यावा.

  • वितळवलेल्या गुळात किसलेले ओले खोबरे घालावे व सारण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत पाच मिनिटांसाठी परतत राहा.

  • तयार झालेल्या सारणात चिमूटभर वेलचीपूड घालावी व सारण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवावे.

  • दुसरीकडे गॅसवर एक भांडे ठेवून त्यात पाणी व समप्रमाणात तांदळाचे पीठ घालून उकड तयार करावी.

  • यानंतर उकड नीट मळून घ्यावी.

  • या पिठाचे गोळे हळदीच्या पानावर पातळ थापून घ्यावेत.

  • थापलेल्या पिठावर सारण पसरावे व हळदीचे पान मध्यभागातून दुमडून घ्यावे

  • सर्व बाजूने पातोळीच्या कड़ा नीट बंद होतील याची काळजी घ्यावी.

  • तयार झालेल्या पातोळ्या पाण्याच्या वाफेवर शिजत ठेवा. किमान १५ ते २० मिनिटांसाठी पातोळ्या शिजवाव्यात.

  • तयार झाल्या आहेत हळदीच्या पानातील गरमागरम पातोळ्या

पातोळ्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे आरोग्यवर्धक फायदे

गूळ - 

भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो. पुरणपोळी, मोदक, शिरा अशा विविध पदार्थांमध्ये गुळाचाच समावेश केला जातो. तज्ज्ञमंडळी देखील आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण गुळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या घटकांचा समावेश आहे. 

  • गुळामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. 

  • गुळामध्ये अँटी -ऑक्सिडंट्स झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलेनियम या पोषक घटकांचा समावेश आहे.

  • लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ. ज्यामुळे शरीरातील रक्तपातळी वाढण्यास मदत मिळते. 

  • गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो. 

हळदीची पाने

हळदीची पाने आरोग्य व त्वचेच्या सौंदर्यासाठी लाभदायक आहेत. या पानांमध्ये कर्क्युमिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट आहे.  हळदीच्या पानांमध्ये  जंतुनाशक आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी पोषक असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या पानांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास शरीरातील अनेक पोषकतत्त्वांची कमतरता भरून निघेल.

तांदळाच्या पिठाचे सेवन करण्याचे फायदे  

पचनशक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना तांदळाच्या पिठाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण हे पीठ ग्लूटेन फ्री असते. तांदळाच्या पिठाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत म्हणजे तांदळाचे पीठ. यामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B6, लोह आणि झिंक यासारख्या पोषणतत्त्वांचाही समावेश आहे.  

तुपाचे आरोग्यवर्धक फायदे 

योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुपाचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहू शकते, शरीराची पचनक्रिया सुधारू शकते, शरीराची हाडे मजबूत होऊ शकतात व महत्त्वाचे त्वचा देखील निरोगी राहू शकते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT