names of 80 villages in district from the plant kolhapur sakal
संस्कृती

कोल्हापूर : तुम्हाला माहितीये का फळे, वनस्पतीवरून पडलीयेत जिल्ह्यातील ८० गावांची नावे

पिंपळाचे पिंपळगाव, करंजीचे करंजफेण!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रत्येक गावाच्या नावालाही काही तरी इतिहास असतो. तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांची नावे, विविध फळे आणि वनस्पतींच्या नावावरून पडल्याचे स्पष्ट झाले आहे. याच गावांत आता ती-ती फळे व वनस्पतींची लागवड करण्यावर भर दिला जाईल. त्याशिवाय या गावांत विविध फळे, पालेभाज्या, वनौषधी, कडधान्य, स्थानिक पिकांची ६० हून अधिक मूळ वाण असल्याचेही अभ्यासातून पुढे आले आहे. त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठीही भर दिला जाईल.

आंतरराष्ट्रीय, स्थानिक फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्गमित्र संस्थेने सर्वेक्षण केले आणि त्यातून ही माहिती पुढे आली आहे. पिंपळाची झाडे अधिक असणारे पिंपळगाव, करंजी अधिक असणारे करंजफेण, वडगाव (वड), म्हाळुंगे (म्हाळुंग), वेखंडवाडी (वेखंड), बेलेवाडी (बेल), हळदी (हळद), कवठेगुलंद (कवठे), शेंद्री (शेंद्री), फणसवाडी (फणस), रुई (रुई), आल्याचीवाडी (आले), पळसंबे (पळस) अशी ८० हून अधिक गावे आहेत. याच गावांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिल्यावर तेथे विविध मूळ वाणांचा खजिना आढळला आहे.

लवकरच कृतिशील आराखडा

अनेक ज्येष्ठ नागरिक व कृतिशील शेतकऱ्यांनी विविध वाणांचे जतन केले. मात्र, अनेक वाणांचे महत्त्व, उपयुक्ततेबद्दल माहितीचा अभावही आहे. अनेक गावांतून परसबागेचे अस्तित्व कमी झाले. शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे नव्या पिढीचा कल आहे; पण हे प्रमाण अल्प दिसते. स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाविषयी थोडीफार जागृती असली तरी कृतीचा अभाव आहे. आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल माहितीचा अभाव असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे लवकरच कृतिशील कार्यक्रम आखला जाणार आहे.

लोकसहभाग महत्त्वाचा

आपापल्या गावची ही अनोखी संस्कृती जपण्यासाठी त्या-त्या गावातील लोकांचा सहभागच महत्त्वाचा राहणार आहे. कारण, निसर्गमित्र असो किंवा कुठलीही संस्था ही मार्गदर्शन करण्यासाठी कधीही उपलब्ध होऊ शकते. पण, प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात लोकांचा सक्रिय पुढाकारच आवश्यक आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही ही संकल्पना उचलून धरली. शासकीय रोपवाटिकांमध्ये मूळ वाणांच्या रोपांची निर्मिती करून ती वितरित करण्यासाठी आता प्रयत्न होतील. पण, त्यासाठी आताच योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. कारण रोपवाटिकांमध्ये आता विविध रोपांच्या निर्मितीला प्रारंभ होईल.

ही संस्कृतीही जपायला हवी

जिल्ह्यातील अनेक गावे विविध पिकांसाठीही प्रसिद्ध आहेत. िस्वटकॉर्नला सध्या मोठी मागणी आहे. पण, शाहूवाडी तालुक्यातील नेर्लीत पिकणारे कणीस खाल्ले तर िस्वटकॉर्नपेक्षाही त्याची चव किती भारी आहे, याचा अनुभव घेता येतो. इंदूरच्या बटाट्याला आपल्याकडे मागणी आहे. मात्र, त्याच्याही पेक्षा चवीला भारी असणारा चंदगडच्या मातीत पिकणारा बटाटा आपल्याकडे येतच नाही. तो कर्नाटकात जातो. त्याला जिल्ह्यातच मार्केट मिळाले तर या बटाट्यालाही मागणी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT