Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : नवरात्रीला आवर्जून करा हे खास उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

पंडीत ऋषिकांत मिश्र शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊयात काही खास उपाय

सकाळ ऑनलाईन टीम

Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. यंदा नवराभत्रीला अद्भुत योग जुळून येतोय. त्यामुळे या काळात देवीच्या विविध स्वरूपांची विधीवत पूजा केल्यास त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. विळ्याच्या पानांचा उपाय तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येईल. तेव्हा पंडीत ऋषिकांत मिश्र शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊयात काही खास उपाय.

नवरात्रीत करा विळ्याच्या पानांचे ४ सोपे उपाय

कुठल्याही देवी-देवतेची विधीवत पूजा करण्यासाठी विळ्याच्या पानांचा वापर केला जातो. अशात तुम्ही जर विळ्याच्या पानांचा हा उपाय केल्यास तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हा उपाय करण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या ५ दिवसांत, विळ्याच्या पानांवर दुर्गा देवीचा मंत्र 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' लिहून देवी दुर्गेच्या पाऊलांपुढे अर्पण करा. आता नवमीच्या दिवशी ही पानं गोळा करून लाल कपड्यात बांधून ते तुमची तिजोरी असलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

दुर्गा देवीला विळ्याची पानं फार प्रिय आहेत. अशात तुम्ही जर विळ्याची पानं अर्पण केलीत तर दुर्गा देवी प्रसन्न होईल. दुसरा उपाय म्हणजे विळ्याच्या पानांवर गुलाबाच्या पाखळ्या ठेवा. यानंतर नवमीला ही सगळी पानं वाहत्या प्रवाहात विसर्जित करा. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतील. (Navratri)

व्यवसायात यश मिळवण्यासाठी करा हा उपाय

कठोर मेहनत करूनही तुम्हाला व्यवसायात यश मिळत नसेल तर हा उपाय कामी येईल. या चमत्कारी उपाय करण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस विळ्याच्या पानांना दोन्ही बाजूने सरसोचे तेल लावून दुर्गा देवीच्या पाऊलांपुढे अर्पण करा. त्यानंतर ही पानं उशाखाली ठेवून झोपा. असे केल्याने व्यवसायात लाभ होईल.

घरातील वाद मिटतील

घरात भरपूर वाद असतील तर हा उपाय आवर्जून करा. हा उपाय करण्यासाठी विळ्याच्या पानांवर केशर ठेवून दुर्गा मातेच्या पाऊलांपुढे अर्पण करा. असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होईल. शिवाय घरातील वादविवादही दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Drugs Seized : मिझोरामधील महिलेकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुणे रेल्वे स्थानकातील कारवाई

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT