Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : शैलपुत्री देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनीच का करतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र

पूजेसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो, असे का? यामागे काही शास्त्र आहे का?

साक्षी राऊत

Navratri 2023 : आज नवरात्रीचा पहिला दिवस. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री देवी प्रथम दुर्गा आहे. तिच्या पूजेसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो, असे का? यामागे काही शास्त्र आहे का? चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते.

देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.

आज या शुभमुहूर्तावर करा घटस्थापना

नवरात्रीला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल.

असे मानले जाते की शुभ-मुहूर्तावर विधीपूर्वक कलश स्थापना केल्यास घरात सुख, समृद्धी नांदते. कलश कधीही लोखंडी किंवा स्टीलचा नसावा. घटस्थापनेपूर्वी जागा अगदी स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्या स्वच्छ जागेवर कलश स्थापना करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT