Navratri 2023  esakal
संस्कृती

Navratri 2023 : तीनशे वर्ष जुन्या मंदिरातील मातेची स्वयंभू मूर्ती, जिथे दिवसभरात दिसतात वेगवेगळी रूपं

कोराडीच्या मंदिराची स्थापना ते मंदिरात मूर्ती कशी प्रस्थापित झाली त्यामागे एक मोठी कथा आहे

साक्षी राऊत

Navratri 2023 : देवीच्या नऊ स्वरूपांची शक्ती नवरात्रीत पृथ्वीवर असते असे म्हणतात. नऊरात्रीला भक्तिभावाने लोक देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा करत उपवासही ठेवतात. नवरात्रीच्या निमित्ताने आज आपण कोराडीच्या मंदिराची आणि तिथे स्थित देवीची स्थापना कशी झाली ते जाणून घेऊया. कोराडीच्या मंदिराची स्थापना ते मंदिरात मूर्ती कशी प्रस्थापित झाली त्यामागे एक मोठी कथा आहे.

नागपूरपासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत भक्त दूरवरून देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. जवळपास ३०० वर्ष जुने कोराडीचे हे मंदिर नागपूरमधील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. कोराडीचे मंदिर १५० एकरात पसरलेले असून या मंदिराची विशेषता म्हणजे देवीचा दरबार चांदीचा बनवण्यात आला आहे.

रूप बदलणारी देवी

कोराडी देवी मंदिरातील मूर्ती स्वयंभू असल्याचं म्हटलं जातं. प्रत्येक प्रहरात तिचे रूप बदलते. सकाळच्या प्रहरी देवी मुलीचे रूप धारण करते तर दुपारी तरूणी रूपात आणि सायंकाळी ती प्रौढरूपात दिसते. नागपुरकरांनी देवीची ही सगळी रूपं जवळून अनुभवली आहेत.

दुसरी विशेषता म्हणजे कोराडी देवीच्या मंदिरात वर्षाचे ३६५ दिवस २४ तास दिव्याची ज्योत प्रज्वलित असते. भक्त दूरवरून इथे दर्शनासाठी येतात. अलीकडेच इथे भक्तांसाठी भोजनव्यवस्थासुद्धा सुरू करण्यात आली आहे. ३० रूपयांत भक्तांसाठी इथे जेवणाची चविष्ट थाळी मिळते.

नवरात्रीचे नऊ दिवस इथे दर्शनासाठी भक्तांच्या दूरवर रांग लागलेली असते. मंदिरावरील कोरीव नक्षीकाम प्राचीनतेचे दर्शन घडवते. असे म्हटले जाते की ज्यांना मूल होत नाही ते देवीच्या दरबारात पूजा पाठ करतात. आणि देवी त्यांची इच्छा पूर्ण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT