Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : आजपासून नवरात्रीला सुरुवात, कलश स्थापनेवेळी विसरू नका हे साहित्य, वाचा वस्तूंची संपूर्ण यादी

धार्मिक मान्यतेनुसार विधीवत घटस्थापना केल्यास देवीची विशेष कृपा भक्तास प्राप्त होते.

सकाळ ऑनलाईन टीम

Navratri 2023 : नवरात्रीत देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिभावाने तिची पूजा आणि उपवास केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार विधीवत घटस्थापना केल्यास देवीची विशेष कृपा भक्तास प्राप्त होते.

नवरात्री वर्षातून दोनदा साजरी केली जाते. एकदा चैत्र महिन्यात ज्यास चैत्र नवरात्र असेही म्हणतात. तर दुसरी शारदीय नवरात्री. या नवरात्रीत देशभरात आंनदोत्सव साजरा केला जातो. यंदा नवरात्री १५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरु झाली असून घटस्थापनेनंतर दूर्गा पूजेला सुरुवात होते. तेव्हा कलश स्थापनेसाठी आवश्यक कोणत्या वस्तू आहेत त्याची संपूर्ण यादी जाणून घेऊयात.

या शुभमुहूर्तावर करा घटस्थापना

नवरात्रीला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल.

कलशस्थापनेसाठी महत्वाचे साहित्य

मातीचा किंवा सोने,चांदी, त्यांब्याचा कलश, आंब्याची पाने, गंगाजल, नाणं, गहू किंवा तांदळाच्या अक्षता

ज्वारी पेरण्यासाठी - मातीचे भांडे, स्वच्छ माती, गहू किंवा बार्ली, स्वच्छ कापड, पाणी

अखंड ज्योतीसाठी - पितळेचा किंवा मातीचा दिवा, तूप, कापसाची वात

घटस्थापना नियम

असे मानले जाते की शुभ-मुहूर्तावर विधीपूर्वक कलश स्थापना केल्यास घरात सुख, समृद्धी नांदते. कलश कधीही लोखंडी किंवा स्टीलचा नसावा. घटस्थापनेपूर्वी जागा अगदी स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्या स्वच्छ जागेवर कलश स्थापना करा.

तत्पूर्वी स्वच्छ जागेवर गंगाजल शिंपडा. यानंतर कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात हळद, अक्षता, लवंग, नाणी, वेलची, सुपारीची पाने आणि फुले टाकून रोळीने कलशावर स्वस्तिक बनवावे. शेवटी, कलश स्थापित करताना, दवीचे स्मरण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT