Navratri 2023  esakal
संस्कृती

Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे ? ‘या’ शुभमुहूर्तावर करा घटस्थापना

शारदीय नवरात्रौत्सव हा सर्वात मोठ्या नवरात्रींपैकी एक मानला जाणारा उत्सव आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2023 : गणेशोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. देशात शारदीय नवरात्रौत्स मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये देवीच्या ९ रूपांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. अनेक ठिकाणी घटस्थापनेसह देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घरोघरी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रौत्सवाचे विशेष महत्व आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून या शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होते. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या ९ दिवसांमध्ये उपवास केले जातात.

आज आपण शारदीय नवरात्रौत्सव कधीपासून आहे ? आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे ? ते जाणून घेणार आहोत.

शारदीय नवरात्रौत्सव कधीपासून ?

शारदीय नवरात्रौत्सव हा सर्वात मोठ्या नवरात्रींपैकी एक मानला जाणारा उत्सव आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते.

हिंदू पंचांगानुसार, या वर्षीचा शारदीय नवरात्रौत्सव अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला अर्थात १४ ऑक्टोबरला रात्री ११:२४ वाजता सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी १५ ऑक्टोबरला दुपारी १२:३२ वाजता संपेल. मात्र, उदय तिथीनुसार यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.

१५ ऑक्टोबरला हा शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जाणार आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी ही महत्वाची मानली जाते. नवरात्रीची ही अष्टमी यंदा २२ ऑक्टोबरला आणि नवमी २३ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.

९ दिवस चालणारा हा नवरात्रौत्सव २४ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होणार आहे. २४ ऑक्टोबरला दसऱ्याचा सण आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी ?

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

शारदीय नवरात्रौत्सव २०२३ तिथी खालीलप्रमाणे

  • १५ ऑक्टोबर – देवी शैलपुत्री (प्रतिपदा तिथी)

  • १६ ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणी (द्वितीया तिथी)

  • १७ ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा (तृतीया तिथी)

  • १८ ऑक्टोबर – देवी कुष्मांडा (चतुर्थी तिथी)

  • १९ ऑक्टोबर – देवी स्कंदमाता (पंचमी तिथी)

  • २० ऑक्टोबर – देवी कात्यायनी (षष्ठी तिथी)

  • २१ ऑक्टोबर – देवी कालरात्री (सप्तमी तिथी)

  • २२ ऑक्टोबर – देवी महागौरी (दुर्गा अष्टमी)

  • २३ ऑक्टोबर – महानवमी (नवमी)

  • २४ ऑक्टोबर – देवीचे विसर्जन दशमी तिथी (दसरा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT