New Year Resolution for 2023 sakal
संस्कृती

New Year Resolution for 2023: नवीन वर्षात संकल्प आनंदी राहण्याचा करा!

दररोज मी सर्व प्रकारच्या लोकांना भेटतो. त्यांच्या समस्यांची विविधता अविश्वसनीय आहे.

सद्‌गुरू,ईशा फाउंडेशन

सद्गुरू : जर तुम्ही जीवनाकडे अगदी खोलवर पाहिले, तर जीवन हे एक ठराविक व्याप्तीचे अवकाश आहे. तुम्ही जीवनाकडे केवळ घटनांचा एक क्रम म्हणून पाहिल्यास जीवन एक ठराविक कालावधी आहे. तुम्ही तुमच्या मानसिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहिले तर, जीवन म्हणजे ठराविक समस्यांचे गाठोडे आहे.

दररोज मी सर्व प्रकारच्या लोकांना भेटतो. त्यांच्या समस्यांची विविधता अविश्वसनीय आहे. जन्म ही एक समस्या आहे, मृत्यू ही एक समस्या आहे, आणि या दोन्हींमध्ये समस्यांची एक अविरत मालिका आहे. आता, नवीन वर्ष येत आहे. तुमच्याकडे हा पर्याय आहे : तुम्ही तुमचे विचार, भावना आणि ऊर्जा, समस्या निर्माण करण्यासाठी गुंतवणार आहात की समस्या सोडवण्यासाठी? याचा अर्थ असा नाही की तुम्ही समस्या निर्माण न करण्याचा संकल्प केला पाहिजे.

त्यासाठी कोणतेही संकल्प करण्याची गरज नाही. तुम्ही संकल्प करता कारण तुम्हाला असे काहीतरी करायचे असते, ज्याकडे तुमचा स्वाभाविक कल नसतो. पण साधी गोष्ट अशी आहे की, तुमचा कल नैसर्गिकरित्या आनंदी असण्याकडे की दुःखी?

विचार करून पहा, तुम्ही लहान असताना, तुम्ही आनंदी होता. कोणाला तरी तुम्हाला दुःखी करावे लागत होते. जीवनाचा नैसर्गिक कल आनंद आणि उत्साहाकडे आहे. येणाऱ्या वर्षात तुम्ही किती आनंदी असाल? फक्त हिशोब ठेवा. व्यवसायात असलेल्या अनेकांना वाटते, की त्यांनी फक्त आयकरासाठी हिशोब ठेवावे. नाही, तुम्ही हिशोब ठेवता कारण तुम्हाला नफा होतो की तोटा, हे कळले पाहिजे.

तुम्ही पुढे जात आहात की मागे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हिशोब ठेवणे आवश्यक आहे. फक्त दिवसाच्या शेवटी तपासा, ‘मी कालपेक्षा आज थोडा जास्त आनंदी आहे का?’ तुम्ही वयाच्या पाचव्या वर्षापासून हे केले असते तर, तुम्ही आतापर्यंत परमानंदात असता. दर दिवशी, दर महिन्याला, फक्त हिशोब ठेवा, ‘मी अधिक आनंदी बनलो आहे की कमी?’ बघण्यासारख्या फक्त या दोन गोष्टी आहेत - तुम्ही किती आनंदी आहात आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांना किती आनंद देत आहात.

लोक त्यांच्या पैशांचा हिशोब ठेवत आहेत, पण जीवनाची खरी संपत्ती म्हणजे तुम्ही किती आनंदी आहात आणि तुमचा जीवनाचा अनुभव किती छान आणि प्रगल्भ आहे.

या ग्रहावरची ही आपली वेळ आहे. आपण याला एक उत्साही, आनंदी, सुंदर ग्रह बनवणार आहोत, की आपण याला दुःखी आणि ​​भयानक बनवणार आहोत? आपल्याला हे दोन्ही प्रकारे करण्याची सूट आहे - निवड तुमची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

शिवानीच्या घरी मागणी घालायला गेलेल्या अमितसमोर सासरेबुवांनी ठेवलेल्या 'या' अटी; घडलेला मोठा ड्रामा, म्हणाला- मला तर...

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

SCROLL FOR NEXT