Old Hindu Rituals Of Menstrual Cycle : मासिक पाळी ही प्रत्येक महिलेला येते. त्यात तिला बराच त्रासही सहन करावा लागतो. या मासिक पाळीशी निगडीत वेगवेगळ्या प्रथा भारतात पाळल्या जातात. प्रत्येक प्रांतानुसार याचं महत्वही बदलतं. काही ठिकाणी मासिक पाळीच्या काळाला विटाळ समजला जातो तर काही ठिकाणी याकाळात स्त्रीला पुजले जाते. पण दोन्ही मागेही एक सूप्त कारण त्या स्त्रीला आराम मिळावा हे असतं.
पाळीशी निगडीत देशात अशाच काय काय प्रथा आहेत जाणून घेऊया.
काही इतिहास तज्ज्ञांच्या मते प्रचीन भारतात पाळीला शुभ मानलं जातं असे. त्यावेळी महिलांना देवीच्या रुपात पूजलं जात असे.
पूर्वीच्या काळी महिला पाळीच्या काळात कापडाचा वापर करत असे. हे वापरेलेले कापड त्या मातीत, जमीनीत पूरत असत. असं मानलं जात की, या कापडांचा वापर काळी जादू करणारे लोक तंत्रमंत्रासाठी करत.
पूर्वीच्या काळी पाळीच्या वेळात महिलांना वेगळं बसवलं जात. यामागे शिवाशिव हे कारण नसून त्या महिलेला आराम मिळावा, तिला एका जागीच जेवण वगैरे मिळावं, तिला श्रम पडू नये हा असे.
याविषयी काही समजगैरसमजही होते. असं मानलं जात की, पाळीच्या काळात एखाद्या महिलेने गायीला स्पर्श केला तर ती वांझ होत असे.
पाळीच्या काळात पाय दूखत असतात. पूर्वीच्या काळा मंदीर फार लांब असंत. त्यामुळे या काळात महिलांना मंदिरात जाऊन पूजा करण्यास मनाई असे.
कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, ओडिसा, आंध्रप्रदेश या भागांमध्ये पाळीशी निगडीत सण साजरे केले जातात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.