Panchang  esakal
संस्कृती

Panchang 24 April : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २४ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ३ शके १९४५

सूर्योदय -०६:१६ वाजता होणार असून सूर्यास्त -१८:५० ला होणार आहे. तर चंद्रोदय ०८:२३ ला होईल. प्रात: संध्याचा मुहूर्त स.०५:०७ ते स.०६:१६ आहे. सायं संध्या १८:५० ते १९:५९ या वेळेत करावी. अपराण्हकाळ १३:४८ ते १६:१८ पर्यंत आहे. तर प्रदोषकाळ १८:५० ते २१:०७ पर्यंत आहे. निशीथ काळ २४:१० ते २४:५६ पर्यंत राहील. शिवाय राहु काळ १७:१६ ते ते १८:५० वाजेपर्यंत आहे. यमघंट काळ १२:३३ ते १४:०७ या वेळेत आहे.

आज श्राद्धतिथी चतुर्थी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी रात्री ०९:४२ पर्यंत शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मुळा खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०९:२५ ते १०:५९

  • अमृत मुहूर्त--  १०:५९ ते १२:३३

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही. बुध मुखात आहुती आहे. शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - तृतीया(०९:१७ प.नं. चतुर्थी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - रोहिणी(२५:५७ प.नं. मृग)

  • योग - सौभाग्य(०९:३७ प.नं. शोभन)

  • करण - गरज(०९:१७ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २१:४२ नं., अक्षय्यतृतीया(सातूचे दान, सातू भक्षण व सातूंचा होम केल्यास पापनाश), गंगास्नान, समुद्रस्नान, जलकुंभ-पंखा-साखर-सुवर्ण दान, विष्णूंना चंदन लावणे, कल्पादि, वैनायकी गणेश चतुर्थी, त्रेतायुगादि, श्री बलराम जयंती, गुरु मेषेत १४:२९, रवियोग २५:५७ पर्यंत आहे.

या दिवशी पाण्यात सातू व गंगाजल टाकून स्नान करावे. आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे. ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सर्व देवांना केशर भाताचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस सुवर्ण दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT