Paush Amavasya 2022 esakal
संस्कृती

Paush Amavasya 2022: वर्षाची शेवटची अमावस्या महत्वाची; जाणून घ्या महत्व विधी अन् मुहू्र्त

पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना केली जाते. विशेषत: पितृ दोष असलेल्यांनी पौष महिन्यात काही महत्वाचे उपाय करावे

सकाळ ऑनलाईन टीम

Paush Amavasya: हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथिला विशेष महत्व आहे. या वर्षाची शेवटची अमावस्या 23 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी स्नान, दान आणि पितृ तर्पण करण्याला विशेष महत्व आहे. सोबतच पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना केली जाते. विशेषत: पितृ दोष असलेल्यांनी पौष महिन्यात काही महत्वाचे उपाय करावे. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

पौष अमावस्या तिथी 22 डिसेंबरला कात्री 7.13 वाजतापासनं प्रारंभ होईल तर 23 डिसेंबरला 3.46 ला समाप्त होईल. उदया तिथिनुसार, पौष अमावस्या 23 डिसेंबरला मानली जाईल. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सूर्योदयापासून ते दुपारी 3.46 मिनीटापर्यंत असेल. (Upay)

पौष अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा हे काम

पौष अमावस्येला सकाळी लवकर अंघोळ करा. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं महत्वाचं मानलं जातं.स्नान केल्यानतंर सूर्याला तांब्याच्या लोट्याने अर्घ्य द्या. सूर्यदेवाला लाल फूल अर्पण करा. या दिवशी उपवास करण्यालाही महत्व आहे. पितृ दोष दूर करण्यासाठी तर्पण कार्य करा. पौष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. सोबतच पित्रांच्या नावाने पिंपळाच्या झाडात तूपाचा दिवा लावा. गरीबांना अन्नदान करा. सोबतच दान पुण्यही करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT