Pitru Paksha esakal
संस्कृती

Pitru Paksha 2022 | पितृपक्षात नविन वस्तूंची खरेदी करावी का? धर्म अभ्यासक सांगतात

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपंधरवडा म्हणजेच पितृपक्ष सुरु होतो. आपल्या संस्कृतीनुसार पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा यासह संपुर्ण कुटूंबाला पितरांचा आशिर्वाद प्राप्त व्हावा या उद्देशाने याकाळात श्राद्ध, तर्पण, पिंडदान विधी केले जातात. पितरांच्या स्मरणाचा हा काळ मानला गेला आहे. मात्र तरीही या काळात कुठल्याही नविन वस्तूंची खरेदी किंवा व्यवहार करु नये असे मानले जाते. मात्र हे मानणे कितपत योग्य आहे आणि या काळात खरेदी किंवा व्यवहार करावे कि नाही हे आपण धर्म अभ्यासकांच्या मते जाणून घेणार आहोत.

पितरांच्या मुक्तीसाठी तथा त्यांच्या मोक्षप्राप्ती साठी श्रद्धेने केल्या जाणाऱ्या विधीला ज्यातिष आणि धर्मशास्त्रात श्राद्ध म्हटलं जातं. या काळात घरोघरी श्राद्ध, तर्पण, पिंडदान विधी केले जातात. पितृ प्रसन्न व्हावे त्यांचे आशिर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी मोठ्या श्रद्धेने या काळात श्राद्धविधी केले जातात; मात्र तरीही पितृपंधरवड्यात काही नविन वस्तूंची खरेदी किंवा आर्थिक व्यवहार टाळले जातात. यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पितृपंधरवड्याचा काळ हा जरी पितरांचा असला तरी त्याला अशुभ काळ मानणे हे योग्य नाही. आपल्या कुटूंबातील आपल्या पितरांमुळेच आज आपला जन्म झाला आहे.

आपल्याला जन्म मिळाला हे पितरांचे आपल्यावर ऋण आहे आणि पितृपक्षाचा हा काळ त्यांचे हेच ऋण व्यक्त करण्याचा आहे. त्यामुळे या काळात आपण कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा नविन वस्तूंची खरेदी केली तर आपल्या पितरांना आनंदच होईल. पितृ म्हणजे आपल्याच कुळाचा हा भाग असून जर आपल्या कुटूंबातील कोणी प्रगती करत असेल तर आपले पितृ का नाराज होतील? त्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता पितृपक्षाच्या काळात खरेदी तथा आर्थिक व्यवहार करावे. किंबहूना या काळात केलेला व्यवहार हा पितरांच्या आशिर्वादाने उदयास जाईल असेही पं. नरेंद्र धारणे आवर्जून म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT