Vastu Tips
Vastu Tips 
संस्कृती

Vastu Tips : घरी राधा-कृष्णाचे चित्र कोणत्या दिशेला असावे? पहा काय सांगते शास्त्र..

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. वास्तूच्या नियमांनुसार घरी ठेवलेल्या वस्तू जीवनात सुख-समृद्धी आणतात. घरात चुकीच्या ठिकाणी काही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार काही वस्तू घरी नीट ठेवाव्यात असे म्हटले जाते.

राधा-कृष्ण हे प्रेम, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. लोक घरात राधा-कृष्णाची चित्रे लावतात. अशा परिस्थितीत वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र वास्तूनुसार राधा-कृष्णाचे चित्र कोणत्या दिशेला लावणे शुभ आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत..

घरात सुख-समृद्धी येईल

शास्त्रानुसार, देवाच्या मूर्ती बेडरूममध्ये ठेवणे शुभ नसले तरी राधा-कृष्णाचे चित्र योग्य दिशेने लावता येते. राधा-कृष्णाचे चित्र लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात सुखाचे आगमन होते. गरोदर स्त्रियांच्या खोलीत राधा-कृष्णाचे चित्र लावल्याने बालगोपालसारखी मुले प्राप्त होतात, असे मानले जाते.

कोणत्या दिशेने चित्र असावे

शास्त्रानुसार, बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. बेडरूमची भिंत बाथरूमला जोडलेली असेल तर त्या भिंतीवर चित्र लावू नये. हे राधा-कृष्णाचे चित्र असे असावे की, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत आहेत. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी सोबतच व्यवसायातही लाभ होतो.

राधा-कृष्णाच्या चित्राशिवाय इतर कोणत्याही देवतेची मूर्ती किंवा चित्र भिंतीवर लावू नये. तसेच, चित्राकडे पाय ठेवून झोपू नये. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. चित्र लावल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ श्रीकृष्णाची पूजा करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 10 किलोपर्यंत मोफत रेशन देणार- मल्लिकार्जुन खर्गे

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT