Rath Saptami 2023 esakal
संस्कृती

Rath Saptami 2023 : आज सूर्याला अर्घ्य दिल्याने आजारांपासून मिळते मुक्तता

रथ सप्तमी हिंदू धर्मियांसाठी फार खास दिवस असतो. या दिवशी उगवत्या सुर्याला अर्घ्य देण्याचं महत्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rath Saptami 2023 : रथ सप्तमीला सूर्याची पूजा केली जाते. ही पूजा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सप्तमीला केली जाते. याला माघ सप्तमी आणि सूर्य जयंतीपण म्हटलं जातं. अशी मान्यता आहे की, याच दिवसापासून सूर्याने सृष्टीला प्रकाशमान करणं सुरू केलं. म्हणूनच हा दिवस सूर्य जयंती म्हणूनही साजरा केला जातो.

यंदा रथ सप्तमीचा मुहूर्त २८ जानेवारी २०२३ ला पहाटे ५.१८ पासून सकाळी ७.०२ वाजेपर्यंत आहे.

रथसप्तमीचं महत्व

  • रथ सप्तमीला वर्षातली सर्वात श्रेष्ठ सप्तमी मानली जाते.

  • यादिवशी दान पुण्याचं फर महत्व आहे.

  • असं मानलं जातं की, या दिवशी व्रत केल्याने सात प्रकारच्या पापांतून मुक्तता मिळते.

  • या दिवशी सुर्योदयाला नदीत आंघोळ करून दानधर्म करण्याला फार महत्व आहे.

  • सूर्याला अर्घ्य दिलं जातं.

  • लाल वस्तूंचं दान करावं. असं मानलं जातं की, हे केल्याने आजारांपासून मुक्तता मिळते.

  • म्हणूनच याला आरोग्य सप्तमी पण म्हणतात.

कशी करावी पूजा

  • पहाटे उठून आंघोळ करावी

  • ध्यान करून व्रत संकल्प करावा.

  • सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्यात पाणी घ्यावे, रक्त चंदन, लालपुष्प, अक्षता, साखर त्या तांब्याक टाकावे.

  • धूप, दिप, अगरबत्ती लावून सूर्याची पूजा करावी.

  • सूर्य चालीसा वाचावी

  • सूर्य देवाला डाळींब, लाल रंगाची मिठाई, गुळ घालून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

  • गरजूंना दान करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT