संस्कृती

Ravan Shani Dev Katha : रावणामुळे शनिदेवाची साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते; जाणून घ्या कथा

शनिदेवाचा पाय रावणाने कापला होता

सकाळ डिजिटल टीम

शनिदेवाच्या संथ गतीचे कारण रावण असल्याचे मानले जाते. रावण आणि शनिदेव यांच्याबद्दल पौराणिक कथा आहे. या कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. शनिवारी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. असं म्हणतात की शनिदेवाच्या दृष्टीतून कोणीही सुटू शकत नाही.

सर्व ग्रहांमध्ये शनीची हालचाल सर्वात मंद मानली जाते. अडीच वर्षे शनिदेव एका विशिष्ट राशीत राहतात असे मानले जाते, याच काळाला आपण साडेसाती म्हणतो. शनिदेवाच्या संथ गतीचे कारण रावण असल्याचे मानले जाते.शनिदेवाचा पाय रावणाने कापला होता.

रावण हा ब्राह्मण कुटुंबातील होता. रावण हा शिवाचा सर्वात मोठा भक्त होता. रावण एक महान योद्धा तसेच एक चांगला राजकारणी आणि विद्वान व्यक्ती होता. एका आख्यायिकेनुसार जेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी गरोदर राहिली. तेव्हा रावण खूप प्रसन्न झाला.

रावणाच्या मनात होते की आपले होणारे मूल महान, पराक्रमी आणि दीर्घायुष्य असावे, म्हणून रावणाने आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी सर्व ग्रहांना योग्य नक्षत्रात, उत्तम ठिकाणी राहण्यास सांगितले. रावण अत्यंत पराक्रमी असल्याने रावणाच्या भीतीने सर्व ग्रहांनी त्याचे पालन करण्यास भाग पाडले. पण शनिदेवाने रावणाचे ऐकले नाही.

यानंतर रावण रागावला आणि त्याने शनिदेवाला अटक केली बळजबरीने योग्य नक्षत्रात राहायला सांगितले पण शनिदेव आपल्या मतावर ठाम होते. रावणाने आपल्या शक्तींचा वापर करून शनिदेवाला आपल्या प्रभावाखाली घेऊन इतर ग्रहांप्रमाणे शनिदेव योग्य स्थितीत बसवले.

पण, जेव्हा रावणाचा मुलगा मेघनादच्या जन्माची वेळ आली तेव्हा शनिदेवाने दृष्टी फिरवली, त्यामुळे मेघनादचे वय कमी झाले. ही गोष्ट रावणाला कळताच रावणाने संतापून शनिदेवाचा पाय कापला. यामुळे शनिदेवाची हालचाल इतर ग्रहांच्या तुलनेत मंद असल्याचे सांगितले जाते. आणि आपल्याला साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: “कर्जावर कर्ज, व्याजावर व्याज… आता थांबणार!” ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा!

Chhagan Bhujbal: विलीनीकरणाचा निर्णय नव्या नेतृत्वाखालीच; मंत्री छगन भुजबळ, मला एकट्याला काय वाटतं याला अर्थ नाही!

Mumbai News: राज्यभरात ५८ लाख ८९ हजार कुणबी नोंदी; मराठवाड्यामध्ये बीड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अल्प प्रतिसाद!

Ajit Pawar Plane Crash: काश जर वेळ थांबली असती... जय पवार यांची भावूक पोस्ट, अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत म्हणाले...

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT