Shakambhari Navratri Esakal
संस्कृती

Shakambhari Navratri : शाकंभरी नवरात्रोत्सवाची पौराणिक कथा काय आहे?

शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Shakambhari Navratri : शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 30 डिसेंबरला सुरू होत आहे याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव 'बनशंकरी' असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोटा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.

आता बघू या कोण आहे देवी शाकंभरी? 

शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पाले भाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडल.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे.

पूजेची मांडणी कशी करावी?

पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेबोवती चौबाजूने ठेवा. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर-पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवद्य अर्पण करा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा.

ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते?

जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT