Shatta Tila Ekadashi esakal
संस्कृती

Shatta Tila Ekadashi : षटतिळा एकादशीला असा करा तिळाचा वापर, ग्रहदोष होणार दूर

षटतिळाचा अर्थ ६ तीळ म्हणजेच तिळाचा ६ प्रकारे वापर असा होतो. या एकादशीच्या व्रताने ग्रहदोष दूर होतो.

सकाळ डिजिटल टीम

Shatta Tila Ekadashi 2023 Marathi : माघ महिना हा विष्णू देवाचा महिना समजला जातो. माघ महिन्यातल्या कृष्णपक्षाच येणाऱ्या एकादशीला षटतिळा एकादशी म्हणतात. षटतिळाचा अर्थ ६ तीळ म्हणजेच तिळाचा ६ प्रकारे वापर असा होतो. या एकादशीच्या व्रताने ग्रहदोष दूर होतो. जाणून घ्या या एकादशीचं महत्व, मुहूर्त आणि तिळाचा वापर कसा करावा.

मुहूर्त

दि. १७ जानेवारीला ६ वाजून ५ मिनीटांनी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून ३ मीनिटांपर्यंत आहे.

उदय तिथी लक्षात घेऊन एकादशीचं व्रत १८ जानेवारीला केलं जाईल.

तिळाचं धार्मिक महत्व

तिळ हे रोपापासून मिळणारं बी आहे. यात तेलाचे गुण असतात. तीळ काळे आणि पांढरे अशा दोन प्रकारचे असतात. पूजेच्या दिव्यात आणि पितृ कार्यामध्ये या तेलाचा सर्वाधिक वापर होतो.

शनिदोष निवारणासाठी काळ्या तिळाचं दान केलं जातं.

षटतिळा एकादशीला तिळाच्या वापराला श्रेष्ठ मानलं जातं.

या ६ प्रकारे केला जातो वापर

  • तिळाचं स्नान

  • तिळाचं उटणं

  • तिळाचं हवन

  • तिळाचं तर्पण

  • तिळाचं जेवण

  • तिळाचं दान

कसं करावं हे व्रत

हे व्रत एकतर निर्जला ठेवलं जातं किंवा फळं खाऊन केलं जातं.

पुर्णपणे सुदृढ माणसानेच निर्जला व्रत ठेवावं.

बाकीच्यांनी फळं खाऊन करावं.

यात तिळाने स्नान, तिळयुक्त उटणं लावून करावं. तिळयुक्त पाणी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन करावं.

पूजा विधी

गंध, फुल, धूप, दीप, पान सहित विष्णूची षडोपचारी पूजा करावी. या दिवशी उडीद आणि तिळ घालून बनवलेल्या खिचडीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. रात्री तीळ वाहून १०८ वेळा  'ॐ नमो भगवते वासुदेवाय स्वाहा' मंत्र म्हणून हवन करावं. रात्री भजन किर्तन करावं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना जेवण द्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

Land Acquisition: आनंदाची बातमी! भूसंपादनाच्या दाव्यांसाठी ५७ लवादांची नियुक्ती; रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली निघणार

Vidarbha News: मेहकर-चिखली रस्त्यावर भाविकांची पिकअप उलटली; लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे दोन ठार, १७ जखमी

Vidarbha News:मित्राला बांधून ठेवत मैत्रिणीवर अत्याचार; लूटमारीचाही आरोप : कटात सहभागी पाच जणांना अटक

Uday Samant: उद्योगांना पाइपद्वारे गॅसपुरवठा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आढावा बैठकीत घोषणा, काळाबाजार करणाऱ्या कडक कारवाई!

SCROLL FOR NEXT