Shankhanad
Shankhanad Esakal
संस्कृती

Shravan 2022: श्रावण महिन्यात चुकूनही वाजवू नका शंख

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही भगवान शिवची पूजा करताना शंखनाद करत असाल तर काळजी घ्या, कारण महादेवाची पूजा करताना शंखाचा वापर केला जात नाही. भगवान शिवच्या पुजेवेळी शंखनाद करणे निषिद्ध मानले जाते.

आनंद, समाधान, नवचैतन्य देणारा श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिना म्हटला की, भगवान शिव यांचा महिमा आलाचं.भगवान शिव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरीत प्रसन्न होतात.आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात.श्रावन महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे.त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण, यावेळी जर का पूजा करतांना शंख वाजवला तर त्याचाही विपरीत परिणाम होतो बर का !

काय आहे शंख न वाजवण्याची आख्यायिका आता ते पाहु या..

शिवपुराणातील आख्यायिकेनुसार दैत्य राजा दंभ याला मूलबाळ होत नव्हते. संतती प्राप्तीसाठी त्यांनी भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली. दंभ राजाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वरदान मागायला सांगितले. तेव्हा दंभाने पराक्रमी पुत्राचे वरदान मागितले. भगवान विष्णूने दंभ राजाला तसे वरदान दिले आणि दंभ राजाला एक पुत्र झाला.दंभ राजाने त्याचे नाव शंखचूड ठेवले त्यानंतर ब्रह्मा देवाला प्रसन्न करण्यासाठी शंखचूडने कठोर तपश्चर्या केली. शंखचूडच्या तपस्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले. शंखचूडने ब्रह्मदेवाकडे देवांपुढे अंजिक्य होण्याचे वरदान मागितले. तेव्हा ब्रह्मदेवाने हे वरदान देताना शंखचूडला श्रीकृष्ण कवच दिले. तसेच त्याला धर्मध्वजाची कन्या तुलसीशी विवाह करण्याची आज्ञा दिली. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तुळशी आणि शंखचूड यांचा विवाह झाला.

ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यानंतर शंखचूडाच्या मनात अहंकार भरला. आणि त्याने तिनही लोकांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. शंखचूडमुळे व्यथित होऊन देवांनी विष्णूकडे जाऊन मदत मागितली, पण स्वतः भगवान विष्णूंनी या दंभ पुत्राला वरदान दिले होते. म्हणूनच विष्णूने शंकराची आराधना केली, त्यानंतर भगवान शंकर देवतांच्या रक्षणासाठी गेले. परंतु श्रीकृष्णाच्या कवचामुळे आणि शंखचूडाची पत्नी तुळशीच्या सद्गुणधर्मामुळे शिवालाही त्याचा वध करणे शक्य झाले नाही.त्यानंतर विष्णूने एका ब्राह्मणाचे रूप धारण करून, दैत्यराजाकडून कृष्ण कवच घेतले आणि शंखरूप धारण करून तुळशीचे शील हरण केले. यानंतर भगवान शिवाने आपल्या त्रिशूलाने शंखचूडचा वध केला. याच कारणामुळे भगवान विष्णूला शंखाने जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तर भगवान शंकरांने शंखचूडाची वध केला म्हणून शंकराच्या पूजेमध्ये शंखनाद केला जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT