Shravan Somvar 2022 Esakal
संस्कृती

Shravan Somvar 2022: शेवटच्या श्रावण सोमवारी 'या' गोष्टी दान केल्याने मिळते पुण्य

चांगल्या मनाने नवीन आणि स्वच्छ कपडे दान करणे फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

भगवान शंकरासाठी श्रावण महिना हा अत्यंत प्रिय असतो. त्यामुुळे शिवभक्तासाठी हा महिना विशेष आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे.तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजे ते श्रावण सोमवार होय.या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी श्री शंकर भगवानाची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबदल अशी मान्यता आहे कि हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.

आता बघू या शेवटच्या श्रावण सोमवारी दानाचे काय महत्व आहे त्याविषयीची सविस्तर माहिती

भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. असे सांगितले जाते कि श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपुजनात जलाभिषेक रुद्रभिषेकाला विशेष महत्व असते.शेवटच्या श्रावण सोमवारी शिवपूजन करून खालील गोष्टी दान केल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते .

दानाचे महत्त्व प्रत्येक धर्मात आपापल्या परीने सांगितले गेले आहे. सनातन धर्मातील दानधर्माची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. एखाद्याच्या कुवतीनुसार धान्य, कपडे, अन्नपदार्थ, पैसा आणि इतर अनेक वस्तू गरजूंना मूकपणे देऊन विसरणे याला दान म्हणतात.

● हिंंदु धर्मात गाय दान करणे हे श्रेष्ठ मानले जाते. गोदान हे अनेक जन्म आणि अनेक पिढ्यांसाठी हितकारक असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सुख, संपत्ती आणि संपत्ती हवी असेल तर त्याने गाय दान करावी.

● श्रावणात तूप दान करायला खूप महत्त्व आहे. गाईचे तूप भांड्यात ठेवून ते गरजूंना दिल्याने कुटुंबात शुभ वार्ता प्राप्त होते. यासोबतच घरातील सदस्यांचीही प्रगती होते.

● वस्त्र दान केल्याने तुमच्या जीवनात अनेक यश मिळतात. चांगल्या मनाने नवीन आणि स्वच्छ कपडे दान करणे फायदेशीर आहे. तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ लागेल.

● हिंदू धर्मातही श्रावण महिन्यात धान्य दानाला खूप महत्त्व आहे. धान्य दान केल्याने आई लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघीही प्रसन्न होतात. सोबत शिवमुठचे दान केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात. धान्य दान केल्यास इच्छित फळ मिळते, असा समज आहे.

● हिंदू धर्मात श्रावणात तीळ ,जवस, मुग हे धान्य दान करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे.

● मिठाचे दान सनातन धर्मात हितकारक मानले जाते. श्राद्धाच्या वेळी त्याच्या दानाचे महत्त्व खूप वाढते.

● गुळाचे दान केल्याने घरातील वादविवाद संपतात. याशिवाय गरिबी दूर होऊन घरामध्ये संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो. गुळाचे दान केल्याने आनंद वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT