Shravan Somvar Upay Sakal
संस्कृती

Shravan Somvar Upay मनातील इच्छा पूर्ण करायचीय? शंकराच्या पिंडीवर अशा पद्धतीने अर्पण करा बेलाचे पान

मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावणी सोमवारी तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय नक्की करून पाहा.

Harshada Shirsekar

Shravan Somvar Upay : हिंदू परंपरेमध्ये श्रावण महिन्यास विशेष असे महत्त्व आहे. तसेच या महिन्यात भगवान शंकराची उपासना करण्याचीही धार्मिक व खास परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथाची उपासना केल्यास भक्तगणाचे रोग, दोष आणि कित्येक प्रकाराच्या संकटांतून मुक्तता मिळण्याची शक्यता असते, असे म्हणतात. 

तर ज्योतिषशास्त्रातील माहितीनुसार सोमवारी महादेवाची उपासना केल्यास शनीची साडेसाती तसंच ढय्याचा अशुभ प्रभाव देखील कमी होण्यास मदत मिळते. इतकंचे नव्हे तर मनातील एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर देखील श्रावणी सोमवारी भगवान शंकराची उपासना करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. असाच एक उपाय श्री श्रद्धा अॅस्ट्रोलॉजीचे डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे. जाणून घेऊया माहिती…

डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेला उपाय

 "श्रावण महिना सुरू आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महादेवाची उपासना करत आहेत. काही लोक ११, २१, १०१ तर १००१ बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत आहेत. तर काही जण रुद्राभिषेकही करत आहेत", अशी माहिती देत डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढील प्रमाणे एक सोपा उपाय सांगितला. 

मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोपा उपाय  

  • २१ बेलाची पाने घ्या. 

  • चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करा. 

  • तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ॐ नमः शिवाय असे लिहा.

  • ॐ नमः शिवाय लिहिलेली ही बेलाची २१ पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. 

  • आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करावी. 

Content Credit @shreeshraddhaastrology

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT