Shree Ganesh Jayanti 2023 Esakal
संस्कृती

Shree Ganesh Jayanti 2023 : बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती वाढदिवस यंदा कधी आहे?

बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती अर्थात गणरायांचा वाढदिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती अर्थात गणरायांचा वाढदिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा श्री गणेश जयंती 25 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. अनेक जण या दिवशी आपल्या घरात गणरायांची स्थापना करतात. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.

दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी व्रत आणि पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.या दिवशी जो गणरायांची प्रेमाने पूजा करतो त्याला वर्षभर शुभ फळ मिळते. 

भगवान गणेशजी हे बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. त्याच्या कृपेने जीवनात शुभता येते, माणसाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना शुभ आशीर्वाद देतो.

यंदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी मंगळवार, 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.22 वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी, 25 जानेवारी 2023 बुधवारी दुपारी 12.34 वाजता संपेल. उदय तिथीनुसार यंदा गणेश जयंती 25 जानेवारीला साजरी केली जाणार आहे.

श्री गणेश जयंतीचे व्रत कसे करावे?

श्री गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान-ध्यान करून गणपती बाप्पाचे व्रत करावे.दिवसाच्या शुभ मुहूर्तावर गणरायांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.गंगाजलाने गणरायांना साष्टांग नमस्कार घालावा.गणरायांना हळद-कुंकू आणि धूप-दीप दाखवावे. गणपती बाप्पाला मोदक, लाडू, फुले, कुंकू, जानवं आणि 21 दुर्वा अर्पण करा. नंतर संपूर्ण कुटुंबासह गणेशजींची आरती करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT