Spiritual Tips  esakal
संस्कृती

Spiritual Tips : मेडिटेशन करायचंय पण मन एकाग्रच होत नाही? या टिप्स ट्राय करा, नक्की फरक दिसेल...

मानसिक शांतीसाठी ध्यान करावसं तर वाटतं पण मन एकाग्र होत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं.

धनश्री भावसार-बगाडे

How To Concentrate In Meditation : अनेक मानसिक, शारीरिक आजारांवर उपचार म्हणून ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना तो पाळायचाही असतो. पण नेमकं ध्यानाला बसायचं म्हटलं की, डोळे मिटल्यावर नको नको ते सगळे विचार डोक्यात गर्दी करतात. मन एकाग्रच होत नाही. मग ध्यान कसं करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.

आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. जाणून घेऊया कसं करावं मन एकाग्र.

ध्यानाचे फायदे

  • बीपी, निद्रानाश, ताण, डिप्रेशन असे अनेक आजार बरे करण्याची ताकद ध्यानात म्हणजेच मेडिटेशनमध्ये आहे.

  • त्यामुळे मन शांत आणि एकाग्रता वाढण्यासाठी, बुद्धी तल्लक होण्यासाठी ध्यान फार उपयुक्त ठरतं.

  • ध्यानाचे मानसिक आणि शारीरिक फायदे आहेतच.

  • पण त्याबरोबर ध्यानासाठी शिस्त आणि सतत नियमित प्रयत्न करणे आवश्यक असते.

  • नियमित ध्यानाने मन प्रसन्न होते.

मंत्र जप करा

मेडिटेशनच्या सुरुवातीला मंत्र जप करा. त्यामुळे मन शांत होते. विचार कमी होतात.

शांत जागा निवडा

मेडिटेशनसाठी जागा निवडताना जिथे बाहेरचे आवाज नसतील, कोणाचं डिस्टर्बंस होणार नाही अशी शांत जागा निवडावी.

योगासन प्राणायाम

मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी शरीरही रिलॅक्स असणं आवश्यक असतं. त्यासाठी ध्यानाला बसण्यापूर्वी योगासने आणि प्राणायाम करावा. त्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स होतात.

संगीत ऐका

असं सांगितलं जातं की, संगीतात फार ताकद आहे. मन एकाग्र करण्यासाठी संगीताची फार मदत होते. त्यामुळे शांत, मंजूळ वाद्यसंगीत मन एकाग्र करण्यात मदतशीर ठरू शकते.

ध्यानाची वेळ निश्चित असावी

मनाला एक सवय लागणे आवश्यक असते. जेव्हा मनाला एका वेळेची सवय लागते त्यावेळी बरोबर त्या गोष्टीसाठी मन तयार होते. यासाठी ध्यानाची एकच वेळ निश्चित असणे उपयुक्त ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT