Surya Grahan 2022 esakal
संस्कृती

Surya Grahan 2022 : खंडग्रास सूर्यग्रहण काळात नक्की काय करावे काय नको; शास्त्र काय सांगते

अश्विन अमावास्या मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास ग्रस्तास्त सूर्यग्रहण होणार

सकाळ डिजिटल टीम

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते. जर हे तीन्ही अगदी सरळ रेषेत नसतील तर खंडग्रास ग्रहण होतं.

अश्विन अमावास्या मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास ग्रस्तास्त सूर्यग्रहण होणार असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) १२४ क्रमांकाचे आहे.

ग्रहणाचे वेध कधी सुरू होतात

ग्रहण दिवसाच्या ज्या प्रहरात सुरू होते ते सोडून त्याआधीचे ४ प्रहर गृहीत धरावेत. २५ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून २५ मिनीटांनी या ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत.ग्रहण काळात जे नियम पाळणार आहात ते पहाटेपासूनच पाळावेत असा याचा अर्थ होतो.

या काळात काय वर्ज्य करावे

वेधामध्ये जेवण आणि पाणी वर्ज्य केले जावे असे शास्त्रात सांगतात. ग्रहण दुपारी ४ वाजून २२ मिनीटांनी ग्रहण सुरू होते. ग्रहण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अनेक गोष्टी टाळण्यास सांगितले आहे. ग्रहण सुरू झाल्यावर, जेवण, पाणी, मलमुत्र विसर्जन,संभोग, झोप,अभ्यंग स्नान हे वर्ज्य करण्यास शास्त्रात सांगितले आहे.

गर्भवती स्त्रियांनी काय पाळावे

ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते. त्यामुळे गर्भवती स्त्रिया,लहान मुले,वृद्ध आजारी व्यक्ती यांना भुक सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 51 मिनीटापासून ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत म्हणजे सायंकाळी 6 वाजून 6 मिनीटापर्यंत हे नियम पाळावे. या काळात अन्न ग्रहण आणि जल प्राशन करू नये. तसेच ग्रहण लागण्याआधी जेवण केले तरी चालेल.सुर्यग्रहणाच्या काळात अनेक जंतूंचा फैलाव होतो. सायन्सनेही ही गोष्ट मान्य केली आहे.त्यामुळे ग्रहण काळात पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी ग्रहण संपल्यावर प्यावे.

ग्रहण काळत नक्की काय करायचे?

ग्रहणाच्या स्पर्श काळात स्नान करावे. ग्रहणाच्या मध्य काळात धार्मिक विधी काही पूजा,श्राद्ध ज्यांना करायचे आहे अशांनी या गोष्टी कराव्यात. तर ग्रहणाच्या मोक्ष काळात दान धर्म करावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. ग्रहण संपल्यावर पुन्हा एकदा स्नान करावे असे सांगण्यात आले आहे.

ग्रहण मोक्ष झाल्यावर कोणत्या पाण्याने अंघोळ करावी?

गंगा आणि नर्मदा नदीच्या संगमावर ग्रहण मोक्षानंतर अंघोळ केल्यास पुण्य प्राप्ती होईल. हे शक्य नसल्यास विहीरीच्या पाण्यात अंघोळ करावी. तलाव आणि नदीच्या पाण्याची अंघोळ करणेही लाभदायक ठरणार आहे.

कोणते मंत्र जप करावेत?

ग्रस्तास्त ग्रहणात मंत्राचे विधीवत अनुष्ठान होत नाही. त्यामुळे या काळात तूमच्या कुळ देवता,गुरू देवतेची उपासना करू शकता. त्यांचे मंत्र म्हणावेत.त्यामुळे फायदा होतो.

ग्रहणदिवशी श्राद्ध असल्यास काय करावे ?

ग्रहणाच्या दिवशी आमावस्या असल्याने अनेकांच्या घरी श्राद्ध असेल. त्यामुळे त्या दिवशी ज्या लोकांना अन्न ग्रहण करायला चालते त्यांनी करावे. आणि ज्यांना चालत नाही त्यांनी जेवणाचा घाट न घालता गुरूजींना शिधा द्यावा. श्राद्धाचे इतर विधी नेहमीप्रमाणेच करावेत केवळ जेवण देण्याऐवजी शिधा वाटप करावे.

भौगोलिक फळ

भारताच्या पश्चिमेकडील देशात आपत्ती, भुकंप,त्सुनामी यासारख्या घटना घडतील तर सिंधू नदीच्या काठावर देखील ग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो.राजस्थानमधील काही प्रदेशात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai: भाजपने हुकुमशाहीने प्रक्रिया राबवली: पालकमंत्री शंभूराज देसाई, ‘आगे आगे देखो होता है क्या...’

१५४.२ किमी! IPL मध्ये स्पीडचा बादशहा; कोण आहे हा अशोक शर्मा?

रणवीर तर ओके पण 'धुरंधर २' मध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत असते तर? लक्ष्यामामांचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सागर कारंडे बिग बॉसच्या घरातून बाहेर? प्रेक्षक म्हणाले 'सोलो गेम खेळायला हवा होता'

Jaykumar Gore: ‘प्लॅन डी’ असता, तर चित्र वेगळे असते: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; त्यांना सदस्य संभाळता येत नाहीत!

SCROLL FOR NEXT