Khandgras Surya Grahan 2022 esakal
संस्कृती

Surya Grahan 2022 : भारतात दिसणार सूर्यग्रहण असेल ग्रस्तास्त, जाणून घ्या याचा अर्थ

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2022 : आज या वर्षातील शेवटचे असे सूर्यग्रहण आहे. दुपारी 02.29 वाजेपासून हे ग्रहण लागणार असून संध्याकाळी 06.32 वाजता समाप्त होणार. भारतात ग्रहणाला संध्याकाळी 04:22 वाजेला सुरुवात होणार आहे. खग्रास आणि खंडग्रास असे ग्रहणाचे प्रकार आपण ऐकले आहेत. पण तुम्हाला माहितीये का...? यंदा भारतात दिसणारे ग्रहण हे ग्रस्तास्त स्वरूपात दिसणार आहे. काय आहे हे ग्रस्तास्त सूर्यग्रहण पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया.

(Surya Grahan 2022 Grastast Solar eclipse seen in India know its meaning)

पंचांगकर्ते देशपांडे सांगतात, ग्रहणाचा भौगोलिक, शास्त्रीय, धर्मशास्त्रीय, ज्योतिषाशास्त्रीय परिणाम याचा विविध अंगांनी विचाक केला जातो. अंशिक स्वरुपात सूर्यबिंब ग्रस्त झाल्यास ते खंडग्रास सूर्यग्रहण असते.

प्रत्येक अमावस्येला ग्रहण असते का...?

भास्कराचार्यांचा 'सिद्धांत शिरोमणी' ग्रंथात सांगितलं आहे कि सूर्यापासून राहूची अंशात्मक स्थिती वजा करतो त्याला 'व्यहू' अशी संज्ञा आहे. ती जेव्हा 13 किंवा 14 अंशापेक्षा कमी असेल तर ग्रहण संभावते. प्रत्येक अमावस्येला अशी परिस्थिती येईल असे नाही. ज्यावेळी अशी परिस्थिती उद्धभवते त्यावेळेला सुर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रांगेत येतात तेव्हा ग्रहण दृष्यमान होते असे पं. देशपांडे सांगतात.

यंदाचे भारतात दिसणारे ग्रहण हे ग्रस्तास्त

यंदाचे सूर्यग्रहण संपुर्ण भारतात दिसणार आहे. संपुर्ण भारतात दिसणारे हे ग्रहण खंडग्रास आणि ग्रस्तास्त स्वरुपात आहे.

ग्रस्तास्त ग्रहण म्हणजे काय...?

ग्रस्तास्त सूर्याग्रहण म्हणजे यात सूर्याला आधीच ग्रहण लागणार आहे. त्यात ग्रस्त झालेलं सूर्याच जे सूर्यबिंब आहे त्यात सूर्यग्रहणाचा मोक्ष होण्याच्या आधीच सूर्यास्त होऊन जातो. त्यामुळे याला ग्रस्तास्त अशी संज्ञा दिलेली आहे. यंदा भारतात ग्रस्तास्त सूर्यग्रहण दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT