Surya Grahan 2022
Surya Grahan 2022 sakal
संस्कृती

Surya Grahan 2022 : सकाळपासून सुरू झालेत वेध; चुकूनही करू नका 'ही' कामे

सकाळ डिजिटल टीम

Rules in Sutak Kaal : देशभरात सोमवारी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. तत्पूर्वी, वेध सुरू झाले असून, या काळात काही कामं करणं टाळणं फायदेशीर ठरू शकते.

आजचे हे सूर्यग्रहण 4 तास 3 मिनिटांचे असणार असून, दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार आहे. जे संध्याकाळी 06.32 वाजता समाप्त होईल. भारतात संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरूवात होणार आहे. हे वेध सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी होते. यादरम्यान काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते महत्त्वाचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

या काळात करा या नियमांचे पालन

  • या काळात जेवण बनवले जात नाही आणि ते ग्रहणही केले जात नाही. हे नियम आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी लागू नाहीत.

  • या पूर्वी जेवण तयार करण्यात आले असेल तर, त्यामध्ये तुळशीचे पान टाकावे. याशिवाय दूध, पाणी आदींमध्येही तुळशीचं पानं ठेवावं. यामुळे दूषित वातावरणाचा अन्नपदार्थांवर परिणाम होत नाही.

  • गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. वेधांपासून ग्रहण संपेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये तसेच पोटावर गेरू लावून ठेवावे.

  • वेध काळापासून ग्रहणाचा काळ संपेपर्यंत गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण वस्तू वापरू नये.

  • वेध काळात घरातील देवांची पूजा करू नये. त्याऐवजी मानसिक जप फलदायी ठरतो. त्यामुळे अधिकाधिक जप करण्यावर भर द्यावा.

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

SCROLL FOR NEXT