Surya Grahan 2022 Sakal
संस्कृती

Surya Grahan 2022 : ग्रहणानंतर पहिले कोणत्या पदार्थाचे सेवन करावे?

हिंदू धर्मात सूर्यग्रहणाचे खूप महत्त्व मानले जाते. खगोलशास्त्राच्या दृष्टीनेही ही एक महत्त्वाची घटना आहे.

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2022 : हिंदू धर्मात सूर्यग्रहणाचे खूप महत्त्व मानले जाते. खगोलशास्त्राच्या दृष्टीनेही ही एक महत्त्वाची घटना आहे. सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो आणि सुतक काळात आणि ग्रहणाच्या काळात अन्न खाऊ नये असे मानले जाते.

हिंदू मान्यतेनुसार ग्रहण काळात काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काही उपायही सांगितले जातात. मात्र, या सर्वामध्ये सर्वात मोठा प्रश्न असाही निर्माण होतो की, ग्रहण संपल्यानंतर प्रथम कोणत्या पदार्थाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करणार आहोत.

सूर्यग्रहणानंतर तीळ खाणे उत्तम

सूर्यग्रहणानंतर सर्वप्रथम कोणत्या पदार्थाचे सेवन करावे असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर, सूर्यग्रहण संपल्यानंतर सर्वात प्रथम स्नान करावे आणि त्यानंतर गहू, गूळ, तांबे इत्यादी लाल रंगाच्या वस्तूंचे दान करावे. यानंतर तिळापासून बनवलेले पदार्थ जसे की, तिळाचे लाडू, तिळाची चक्की इत्यादी भगवंताला अर्पण करून त्याचे सेवन करावे. सूर्यग्रहणानंतर तीळ खाणे सर्वात उपयुक्त मानले जाते.

सूर्यग्रहणाची वेळ

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण संध्याकाळी 04:28 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 05:30 वाजेपर्यंत असेल. स्थानानुसार ग्रहणाची सुरूवात आणि समाप्ती वेळेत थोडाफार बदल असू शकतो.

तुमच्या शहरात कधी दिसणार सूर्यग्रहण

  • दिल्ली- संध्याकाळी 04:51 ते 05:42 पर्यंत

  • कोलकाता -संध्याकाळी 04:51ते 05:04 पर्यंत

  • मुंबई - 04:49 ते संध्याकाळी 06:09 पर्यंत

  • चेन्नई - 05:13 ते 05:45 पर्यंत

  • पाटणा - 04:42 ते 05:14 पर्यंत

  • जयपूर - 04:31 ते 05:50 पर्यंत

  • लखनौ - 04:36 ते 05.29 पर्यंत

  • हैदराबाद - 04:58 ते 05:48 पर्यंत

  • बंगळुरू - 05:12 ते 05:56 पर्यंत

  • अहमदाबाद - 04:38 ते 06:06 पर्यंत

  • पुणे - 04:51 ते 06:06 पर्यंत

  • नागपूर - 04:49 ते 05:42 पर्यंत

  • भोपाळ - 04:42 ते संध्याकाळी 05:47 पर्यंत

  • चंदीगड - 04:23 ते संध्याकाळी 05:41 पर्यंत

  • मथुरा - 04:31 ते संध्याकाळी 05:41 पर्यंत

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT