Surya Grahan 2023 esakal
संस्कृती

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहाणाला या राशींवर राहील 2 अशुभ योगांची सावली, या 3 राशींवर भारी संकट...

ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं सूर्यग्रहण काही राशींवर दोन अशुभ योगांची सावली घेऊन येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2023 : वैदिक शास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण लागतं त्याचा थेट परिणाम राशीनुसार लोकांच्या आयुष्यावर होतो. यंदाचं पहिलं सूर्यग्रहण २० एप्रिलला असणार आहे. गुरुवारी २० एप्रिलला सकाळी ७.०४ मिनिटांपासून ते दुपारी १२.२९ मिनिटांपर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव राहील. हे सूर्यग्रहण मेष राशी आणि अश्विनी नक्षत्रात लागू शकतं.

ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं सूर्यग्रहण काही राशींवर दोन अशुभ योगांची सावली घेऊन येणार आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

सूर्यग्रहणाला असतील हे दोन अशुभ योग

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा दिवशी सूर्य देव त्यांच्या उच्च मेष राशीत राहु ग्रहासह विराजमान होणार. यासोबतच बुध देवही या राशीत असेल. तर दुसरीकडे मेष राशीचे स्वामी मानले जाणारा मंगळ ग्रह मिथुन राशीत विराजमान होणार आहे. अशात २० एप्रिलला मंगळ आणि बुध दोन्ही ग्रह एकमेकांच्या विरूद्ध राशीत प्रवेश करतील. त्याचा परिणाम म्हणून या राशींवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. या विपरीत योगाला फार अशुभ मानल्या जातं.

या राशींवर ओढवू शकतं संकट

कन्या

सूर्य ग्रहणाच्या दिवशी या राशींची आर्थिक स्थिती बिघडू शकते.कुटुंबात वाद वाढतील. एखादा जुना आजार परत एकदा उद्भवण्याचा धोकाही वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांशी वाद होऊन तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते.

वृषभ

गुरुवारी सूर्यग्रहण दरम्यान होत असलेल्या अशुभ योगांमुळे तुमच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक समस्या येऊ शकतात. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढू शकतो. उत्पन्नाचे स्रोत कमी होऊ शकतात. पैशाची कमतरता असू शकते. तुम्ही घाईत चुकीचा निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. (Astrology)

मेष

अशुभ योगांमुळे या राशीच्या लोकांसाठी 20 एप्रिलला सूर्यग्रहणाचा दिवस त्यांना संकटात पाडू शकतो. तुमच्या चालू असलेल्या कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरीतही अडचणी येऊ शकतात. तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. निराशा तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT