Surya Grahan 2023 esakal
संस्कृती

Surya Grahan 2023 : वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण नक्की कधी आहे? आधीच जाणून घ्या नाहीतर...

वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण नक्की कधी आहे हे माहिती आहे का?

Lina Joshi

Surya Grahan 2023 : २०२३ सुरु होऊन खूप दिवस झाले, पण वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण नक्की कधी आहे हे माहिती आहे का? अर्थात धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोघेही अशुभ मानले जातात. असं म्हणतात की हे ग्रहण कोणीही बघू नये त्यात प्रत्येक ग्रहण हे काही लोकांसाठी वर्ज्य असतं त्यामुळे त्यांनी तर त्यादिवशी विशेष काळजी घ्यावी.

पण हे सूर्यग्रहण नक्की कुठे आणि कधी दिसणार आहे याबद्दल खूप उत्सुकता असेल नाही? चला तर बघूया की यावर्षीच पहिलं सूर्यग्रहण नक्की कधी असेल, कुठे असणार आहे?, त्याचा वेध काळ नक्की किती आहे आणि हे ग्रहण कोणासाठी वक्री आहे ते बघूया...

वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?

२०२३ चे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर, व्हिएतनाम आणि तैवान या देशातून दिसणार आहे.

वेध कालावधी किती असेल?

यावेळी पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अशा स्थितीत वेध कालावधीही येणार नाही. मान्यतेनुसार वेध काळ हा अशुभ काळ किंवा दूषित काळ मानला जातो. वेध काळात देवाची पूजा करण्यास मनाई असते शिवाय या काळात मंदिरांचे दरवाजेही बंद केले जातात. एवढेच नाही तर वेध काळादरम्यान खाणे-पिणेही निषिद्ध आहे. हे ज्ञात आहे की सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी वेध कालावधी सुरु होतो.

सूर्यग्रहण वेळ

सूर्यग्रहण सुरु होते - सकाळी ७:०० पासून (२० एप्रिल २०२३)

सूर्यग्रहण कधी समाप्त होते - दुपारी १२:२९ वाजेपर्यंत (२० एप्रिल २०२३)

२०२३ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल?

२०२३ मध्ये एकूण ४ ग्रहण दिसणार आहेत. २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत. हे ग्रहण जगाच्या विविध भागात दिसणार आहेत.

१. पहिले सूर्यग्रहण - २० एप्रिल २०२३

२. पहिले चंद्रग्रहण - ५ मे २०२३

३. दुसरे सूर्यग्रहण - १४ ऑक्टोबर २०२३

४. दुसरे चंद्रग्रहण - २९ ऑक्टोबर २०२३

ग्रहण काळात काय करावे?

१. तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल.

२. घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात.

३. ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा.

४. ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. विशेषत: तसेच या काळात दान करणे देखील शुभ मानले जाते.

ग्रहण काळात हे काम करु नका

१. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.

२. ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे.

३. सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका.

४. विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये.

५. ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT