Swapna Shastra esakal
संस्कृती

Swapna Shastra : तुम्हालाही दिसतात का ही 5 स्वप्न, चुकूनही कोणाला सांगू नका नाहीतर...

जाणून घेऊया कोणती स्वप्ने कोणाला सांगू नयेत?

सकाळ ऑनलाईन टीम

Swapna Shastra : झोपताना प्रत्येकजण स्वप्न पाहतो आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, काही लोक झोपेतून उठल्याबरोबर त्यांची स्वप्ने विसरतात तर काहींना दिवसभराची स्वप्ने आठवतात. अनेक वेळा एखादं स्वप्न असतं ज्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असतं त्याचा अर्थ काय? अशाच प्रश्नांची उत्तरे स्वप्न विज्ञानात दिली आहेत.

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे शुभ आणि अशुभ चिन्हे दडलेली असतात. काही स्वप्ने चांगल्या दिवसांकडे निर्देश करतात, तर काही स्वप्ने भविष्यातील संकटांचा इशारा देतात. झोपेतून उठल्यानंतर काहीजण अशी स्वप्ने कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करतात. पण काही स्वप्ने कोणाला सांगू नयेत कारण या स्वप्नांमुळे नफ्याऐवजी तोटाच होऊ लागतो. जाणून घेऊया कोणती स्वप्ने कोणाला सांगू नयेत?

जर तुम्हाला स्वप्नात तुमचाच मृत्यू दिसत असेल

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसत असेल तर हे स्वप्न कोणाला सांगू नका. कारण या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे आणि हे स्वप्न तुम्ही कोणाला सांगितल्यास येणाऱ्या आनंदाला नजर लागेल.

पालकांना पाणी पाजणे

जर तुम्ही स्वप्नात तुमच्या आई-वडिलांना पाणी पाजत असाल तर याचा अर्थ भविष्यात तुमची प्रगती होणार आहे. स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न कुणालाही सांगू नये कारण ते प्रगतीत अडथळे निर्माण करू शकते.

चांदीने भरलेला कलश

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर याचा अर्थ असा होतो की लवकरच देवी लक्ष्मी आपला आशीर्वाद देणार आहे. हे स्वप्न एक चांगले भविष्य दर्शवते. हे स्वप्न कोणाला सांगितल्यास लक्ष्मी माघारी फिरते.

स्वप्नात देवाचे दर्शन

जर तुम्हाला स्वप्नात देव (Lord Vishnu) दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला तुमच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न कोणालाही सांगू नये.

फळांची बाग

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात फळांची बाग दिसली तर ते तुमच्या चांगल्या भविष्याचे लक्षण आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. स्वप्न शास्त्रानुसार तुमचे स्वप्न कोणाशीही शेअर करू नका.

डिस्क्लेमर : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. सकाळ समुह याची पुष्टी करत नाही. यासाठी तज्ञाचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Latest Maharashtra News Updates : धानोरीत बिल्डरच्या निष्काळजीपणाविरोधात मयूर किलबिल सोसायटीत आंदोलन

SCROLL FOR NEXT