Ashadhi Ekadashi 2022 Date esakal
संस्कृती

Ashadhi Ekadashi 2022 Date: यंदाची आषाढी एकादशी कधी साजरी होणार, जाणून घ्या व्रत महत्व आणि माहिती

यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) रविवारी 10 जुलै 2022 रोजी आहे.

सकाळ डिजिटल टीम

विठ्ठलाच्या दर्शना साठी पाई निघणाऱ्या 'पंढरपूर वारी'ला जुनी परंपरा लाभलेली आहे.विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे.दरवर्षी भक्त पायदळ पंढपूरला जातात.मागील दोन वर्षात कोरोनाकाळात भक्तांची हुकलेली पंढरीची वारी यावर्षी हजारो भक्तांसह पंढरपूरला निघाली आहे.महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. यंदा आषाढी एकादशी रविवारी 10 जुलै 2022 रोजी आहे. (Ashadhi Ekadashi 2022 Date)

आषाढी एकादशीच्या व्रताचे विशेष महत्व (Importance

आषाढी एकादशी व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते, अशी आस्था आहे, आषाढी एकादशीचे उपवास केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते. वर्षभरात येणाऱ्या एकादश्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

पंढरपूर वारीची परंपरा

समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात. यास 'पंढरीची वारी' असं म्हटलं जाते. यात सामिल होणारे सगळे 'वारकरी' असतात.आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात.(Pandharpur) वाटेत विठुरायाच्या नावाचा जप करत पायी जाताना भक्तांच्या मनी ध्यानी फक्च विठ्ठलाचे नामस्मरण असते.आषाढी एकादशीच्या शुभ दिवसापर्यंत सगळे भक्त पंढरपूरी पोहोचले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT