Tulsi Vivah 2022 Esakal
संस्कृती

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहला करा 'हे' सोपे उपाय; वैवाहिक जिवनात नांदेल आपोआप सुख शांती

जीवनात पती-पत्नीचे नाते महत्त्वाचे मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

जीवनात पती-पत्नीचे नाते महत्त्वाचे आहे. पती-पत्नी हे आयुष्यातील सुख-दुःखचे साथीदार असतात. मात्र, काही कारणामुळे या नात्यात तणाव निर्माण होतो. नात्यातील तणाव दूर करत गोडवा वाढवण्यासाठी तळाशी विवाहाच्या दिवशी काही उपाय करणे लाभदायक ठरते. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) केला जातो. 

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. दिवाळी सणाची सांगता तुळशीच्या लग्नाने केली जाते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला (Dev uthani ekadashi) विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीनंतर लग्नासारख्या मोठ्या सेलिब्रेशनला, चांगल्या कामांना सुरुवात केली जाते. प्राचीन काळापासून तुळशी विवाहाच्या दिवशी  (Tulsi vivah) तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जातं. शाळीग्रामासोबत तुळशीचं लग्न लावण्याच्या प्रथेमागील कहाणीदेखील तितकीच खास आहे.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवसानंतर विवाह मुहूर्ताला सुरूवात होते. या दिवशी काही उपाय केल्यास वैवाहिक जीवन सुखी होत नात्यात गोडवा निर्माण होतो. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

यंदा कधी आहे तुळशी विवाह मुहूर्त?

यंदा 5 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह आहे. मात्र, यंदा तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नासाठी मुहूर्त नसेल. या दिवशी शुक्र नक्षत्र अस्त असल्याने ही परीस्थिती निर्माण झाली आहे. लग्न मुहूर्तासाठी शुक्र ग्रहाचा उदय होणे गरजेचे आहे. ज्योतिष शास्त्रात, शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रहाला वैवाहिक सुखाचा कारक मानले जाते.

वैवाहिक जिवनात सुख शांती नांदण्यासाठी हे उपाय करावे...

जीवनात पती-पत्नीचे नाते महत्त्वाचे मानले जाते. पती-पत्नी हे आयुष्यातील सुख-दुःखचे साथीदार असतात. मात्र, काही कारणामुळे या नात्यात तणाव निर्माण होतो. ज्यांच्या वैवाहिक जीवनात किंवा पती-पत्नीच्या नात्यामध्ये काही तणाव निर्माण झाला असेल, अशा लोकांनी तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय करणे खूपच लाभदायक मानले जाते. या उपायामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होत प्रेम आणि आनंदात वृद्धी होते.

1) तुळशी विवाहाच्या दिवशी पती-पत्नीने नदीत स्नान करावे. नदीत स्नान करते शक्य नसेल तर नदीच्या पाण्याने घरी स्नान करा. यानंतर स्वच्छ पाण्यात तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी घरात शिंपडा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

 2) पती-पत्नीने तुळशी विवाहात एकत्र सहभागी व्हावे. तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करा. शक्य असल्यास तुमच्या घरात तुळशीविवाह केला पाहिजे. असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

SCROLL FOR NEXT