Valentine Week Love Horoscope
Valentine Week Love Horoscope  esakal
संस्कृती

Valentine Week Love Horoscope : व्हॅलेंटाइन वीकमध्ये या 5 राशींत असणार प्रेमच प्रेम, तुमची रास कोणती?

सकाळ ऑनलाईन टीम

Valentine Week Love Horoscope : उद्यापासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होत आहे. विवाहित आणि अविवाहित दोन्ही जोडप्यांसाठी हा वीक फार खास असतो. हा संपूर्ण वीक जोडपी एकमेकांसोबत प्रेमाच्या क्षणांचा आनंद घेत असताता. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या पाच राशींमध्ये या वीकमध्ये प्रेमच प्रेम असणार आहे. तेव्हा या राशी कोणत्या ते जाणून घ्या.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदादायी असणार आहे. तुमच्यामधील प्रेम जीवन मजबूत करण्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने निकाल देतील. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असेल आणि तुमचे मत उघडे ठेवल्यास भविष्यात तुमच्यासाठी आनंदी दिवसांचे दरवाजे उघडतील.

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. पण तुम्ही जर निष्काळजी आणि आळशी असाल तर प्रेम संबंधांमध्ये समस्या वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी वेळ अनुकूल राहील आणि मन प्रसन्न राहील. मात्र, यावेळीही संवादातून समस्या सोडविल्यास बरे होईल.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमप्रकरणासाठी त्रासदायक ठरू शकतो आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही संयम ठेवावा. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

कर्क (Cancer)

आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीचे लोक त्यांच्या लव्ह लाईफबद्दल खूप निराश होतील. एकटेपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी, प्रेम जीवन रोमँटिक असेल आणि प्रेम मजबूत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना देखील बनवू शकता.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंद आणेल. परंतु तुम्ही त्या आनंदाकडे न पाहता निराशेकडे अधिक लक्ष द्याल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितके अधिक भविष्याभिमुख असाल तितके तुम्ही जीवनात अधिक आरामशीर असाल.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमप्रकरणात अहंकाराचा संघर्ष टाळावा, तर चांगले परिणाम समोर येतील आणि मन प्रफुल्लित राहील. कोणत्याही खरेदी इत्यादींबाबत वादही वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी जीवनात आदर वाढेल आणि परस्पर प्रेम वाढेल.

तुला (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या संमिश्र असणार आहे. थोडं प्रेम आणि थोडं गम असं काहीस हा आठवड्या राहणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी भरभरुन प्रेम वाढणार आहे. (Horoscope)

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी आनंददायी आहे. परस्पर समंजसपणाही चांगला राहील आणि मन प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटी, जर तुम्ही परस्पर चर्चेद्वारे कोणताही गोंधळ सोडवला तर चांगले परिणाम दिसून येतील.

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमप्रकरणाच्या बाबतीत सर्व काही ठीक राहील, परंतु एखाद्या गोष्टीबाबत मनावर खूप ताण असेल आणि अस्वस्थता जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मात्र एखाद्या स्त्रीच्या मदतीने तुमच्या प्रेमजीवनात शांतता राहील.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये वेळ अनुकूल असेल आणि परस्पर प्रेम मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्याने मन मात्र उदास राहील.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेमप्रकरणाच्या बाबतीत दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागू शकतं. कोणताही गोंधळ चर्चेने सोडवला पाहिजे तरच शांतता राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र वेळ अनुकूल होईल आणि परस्पर प्रेम दृढ होईल. (Astrology)

मीन (Pisces)

या राशीसाठी हा आठवडा आनंददायी आहे. जरी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेम जीवनातील कोणत्याही नवीन निर्णयाबद्दल थोडे साशंक असाल, परंतु जर तुम्ही या निर्णयाची अंमलबजावणी केली तर तुम्हाला जीवनात आनंद आणि सुसंवाद मिळेल.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT