Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : घरात सतत भांडण होतात? 'हे' उपाय नक्की करा

घरात छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होत असतील तर, ही समस्या वास्तूच्या या उपायांनी सोडवता येते.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : काही घरांमध्ये सतत वाद होत असतात. प्रत्येक जण घरात शांततेची अपेक्षा करत असतात. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु बर्‍याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. वास्तूच्या या उपायांनी ही समस्या सोडविली जाऊ शकते.

पती आणि पत्नीमध्ये वाद

वास्तूशास्त्रानुसार, जर पती-पत्नी मध्ये विवाद असेल तर हे वास्तू दोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये. हलका रंग असला पाहिजे. असे म्हटले जाते की, हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्य वाढवते.

घरातील सदस्यांनी सतर्क व्हा

घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडणे होत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे. त्वरित वास्तू दोषाचे निवारण करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभुत असते. वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे.

खर्चासंबंधी भांडण

वास्तूशास्त्रानुसार घरात आर्थिक विषयांवरून वाद असल्यास. खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते.

आपुलकीचा अभाव

एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तूदोषामुळे होते. म्हणून, रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तूपात भिजवलेला कपूर जाळा. असे म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT