Vastu Tips  Esakal
संस्कृती

Vastu Tips : चुकूनही या दिशेला डस्टबिन ठेवू नये; होतील वाईट परिणाम  

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते असे म्हटले जाते

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते असे म्हटले जाते. वास्तूनुसार घरात एखादी वस्तू कोणत्या दिशेला ठेवली जाते त्याचा घरातील अनेक गोष्टींवर खूप प्रभाव पडतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा निश्चित केलेली आहे. वास्तूचे हे नियम पाळले नाहीत तर घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

घरामध्ये कोणतीही वस्तू योग्य दिशेने न ठेवण्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. वास्तूमध्ये डस्टबिनची देखील ठरावीक दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. वास्तूनुसार घरात ठेवलेली डस्टबिन योग्य ठिकाणी नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम हा आपोआप कुटुंबातील सदस्यांवर होत असतो. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या लेखात आपण वास्तुनुसार डस्टबिन कोणत्या दिशेला असावी आणि कोणत्या दिशेला ठेवू नये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

सुरूवातीला बघू या वास्तुशास्त्रानुसार  घरातील डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे?1) डस्टबिन नेहमी तुमच्या  घराच्या मागच्या बाजुला असावी. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य किंवा उत्तर-पश्चिम दिशेला डस्टबिन ठेवणे शुभ असते. 2) कचरा विसर्जनासाठी हे निर्देश योग्य मानले गेले आहेत. घरात या दिशेला डस्टबिन ठेवल्याने वास्तुदोष होत नाहीत. त्यामुळे गस्टबिन कायम योग्य दिशेलाच ठेवा. यामुळे तुमच्या घरातील वातावरण चांगले आणि आनंदी राहील. 

चुकूनही या दिशेला डस्टबिन ठेवू नये..

1) वास्तूनुसार डस्टबिन विशिष्ट दिशेला अजिबात ठेवू नये. विशेषतः उत्तर-पूर्व दिशेला कधीही ठेवू नका. 

2) ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली गेली आहे. या दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे घरात वास्तुदोष होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. 

3) तसेच डस्टबिन पूर्व, आग्नेय आणि उत्तर दिशेला ठेवू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT