Vastu Tips 
संस्कृती

Vastu Tips : स्वयंपाकघरात 'या' वस्तू अजिबात ठेवू नका; अन्यथा होईल मोठे नुकसान

स्वयंपाकघरात कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी ठेवणे यासह ते योग्य दिशेने ठेवले आहे का याचा प्रभाव पडतो.

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात घडत असलेल्या गोष्टींचा व्यक्तीच्या आरोग्यावरही चांगला किंवा वाईट परिणाम होतो असतो. प्रत्येक महिलेच्या किंवा संपूर्ण कुटूंबाच्या जीवनात स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. स्वयंपाकघरात कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी ठेवणे यासह ते योग्य दिशेने ठेवले आहे का याचा प्रभाव पडतो. त्यामुळे अशा काही गोष्टीत वास्तुदोष असेल तर तेथील आशीर्वादही निघून जातात आणि पैशाची कमतरता भासते. तर जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी घरात ठेवू नयेत.

तुटलेली भांडी

अनेकवेळा काहींच्या किचनमध्ये तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी असतात. अशी भांडी किचनमधून ताबडतोब बाहेर काढली पाहिजेत. कारण अशी भांडी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो.

स्वयंपाकघरात झाडू ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, झाडू स्वयंपाकघरात ठेवू नये. कारण झाडूमध्ये घाण असते. त्यामुळे स्वयंपाकघरातील गोंधळ आणि कचरा वाढू शकतो. स्वयंपाकघरात सदस्यांसाठी जेवण तयार केले जाते. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

अॅल्युमिनियमची भांडी

वास्तुशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, अॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. ही धातूची भांडी ठेवल्याने त्वचेसह अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.

कीटक निरोधक

किचनमध्ये कीटकनाशकेही ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. यासोबतच खाण्याच्या ठिकाणी विषारी पदार्थ ठेवणे धोकादायक ठरू शकते.

काच

काच किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नये. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. यासोबतच घरगुती त्रासाला सामोरे जावे लागते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT