फायदे तुळशीचे Esakal
संस्कृती

Tulsi Use तुळशीच्या या उपायामुळे जीवन होईल आनंददायी, घरात होईल भरभराट

ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीचे काही उपाय सांगण्यात आले आहे. योग्य पद्धतीने आणि विधीपूर्वक हे उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होतात

Kirti Wadkar

हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्वाचं स्थान आहे. हिंदू शास्त्रानुसार तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते. यासाठी तुळशीला पवित्र मानलं जातं. कोणतीही पुजा विधी किंवा धर्मकार्य असो तुळशीचा Tulsi वापर केला जातो. Vastu Tips Marathi know the benefits of Tulsi at your home

धार्मिक ग्रंथांमधील उल्लेखांनुसार भगवान विष्णूंना Lord Vishnu देखील तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचं नित्यनेमाने पूजन केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. हिंदू धर्मामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुळशी वृंदावन लावलं जातं. दररोज तुळशीचं Tulsi पूजन केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.

ज्योतिष शास्त्रामध्ये Astrology तुळशीचे काही उपाय सांगण्यात आले आहे. योग्य पद्धतीने आणि विधीपूर्वक हे उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होतात. यश आणि आर्थिक भरभराट होते. या उपायांमुळे तुमचं जीवन संपूर्णपणे बदलू शकतं.

तुळशीच्या या उपायांमुळे जीवनात येईल आनंद

- एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्यात पंजिरी बनवा. यावेळी यामध्ये काही तुळशीची पानं नक्की टाका. तुळशीच्या या पानांमुळे विष्णूदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

- जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये सतत अपयश येत असेल तर तुळशीच्या मुळाचा एक तुकडा मोडून तो स्वच्छ धुवा. या मुळाची विधिवत पूजा करा. त्यानंचर हे मूळ एका पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून कायम आपल्या सोबत ठेवा यामुळे अडचणी दूर होण्यास मदत होईल.

तुळशीच्या या उपायामुळे होईल धनलाभ

जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे चिंतेत असाल तर तुळशीचा हा उपाय तुम्ही करूव पहा. यासाठी रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावून नमस्कार करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील.

तसंच तुळशीच्या मुळाचा एक तुकडा एखाद्या ताविजमध्ये खाला आणि हे तावीज गळ्यामध्ये घाला यामुळे तुम्हाला धनलाभ होईल आणि पैशांच्या अडचणी सुटतील.

हे देखिल वाचा-

तुळशीचे इतर उपाय

तुळशीचं रोप दारात किंवा छतावर लावल्याने घरातील अनेक वास्तू दोषही दूर होतात.

जर तुमच्या घरात किंवा कार्यालयामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर तुळशीच्या मुळांची माळ बनवा किंवा बाजारातही ही माळ सहज मिळते. ही माळ देवघरात ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल..

जर तुमचं मुल हट्टी असेल तर घराच्या पूर्वीला तुळशीचं रोप लावा आणि मुलाकडून रोज या रोपाची पूजा करून घ्या. तसंच तुळशीची ५ पानं रोज मुलाला खाण्यास द्या.

पवित्र तुळशीच्या ज्याप्रमाणे सर्व शुभ आणि मंगल कार्यांमध्ये वापर केला जातो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीचे ज्योतिषशस्त्रातील हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.

टीप - हा लेख ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा कुठलाही हेतू नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT