हत्तीच्या जोडीची कमाल Esakal
संस्कृती

Vastu Tips: घरात ठेवा हत्तीची जोडी, Love Life होईल रोमॅण्टिक आणि पैशांची तंगी देखील होईल दूर

हिंदू धर्मामध्ये हत्तीला पूजनीय स्थान आहे. यामुळे वास्तू शास्त्रात हत्तीच्या जोडीचे वास्तू दोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत

Kirti Wadkar

अनेकदा घरात पती पत्नी अनेक वर्षांपासून एकत्र राहत असले तरी त्यांच्यातील प्रेमाचं नात विस्कटून दुरावा निर्माण झालेला असतो. घरात सतत वाद आणि कलह निर्माण होतो. नोकरी धंदा असूनही घरात पैशांची तंगी Money Problems जाणवते. Vastu Tips Marathi know the importance of elephant pair statues in home

घरातील विविध समस्यांसाठी अनेकदा वास्तू दोष Vastu Faults देखील कारणीभूत असू शकतो. घरातील कलक, वाद किंवा पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये Vastu Shastra विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

वास्तू शास्त्रातील काही उपायांमुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या कमी होवू शकतात. यापैकीच एक उपाय म्हणजे घरात हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवणं. आजवर तुम्ही विविध ठिकाणी हत्तीच्या विविध धातूच्या किंवा मातीच्या आणि सिरॅमिकच्या हत्तीच्या जोडींच्या मूर्ती तसंच पेंटिगही पाहिले असतील. या हत्तीच्या जोडी या केवळ शोभेसाठी नसून या घरात ठेवल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत होते.

खरं तर वैदिक काळापासूनच हिंदू धर्मासह विविध धर्मामध्ये हत्तीला Elephant पवित्र आणि शुभ मानण्यात आलंय. हत्ती हे श्रीगणेशाचं प्रतिक मानलं जातं तसंच पुराणानुसार हत्ती लक्ष्मीच्या शेजारी उभे राहून तिची सेवा करतात.

तसचं ऐरावत हे स्वर्गाचा राजा इंद्राचं वाहन आहे. हिंदू धर्मामध्ये हत्तीला पूजनीय स्थान आहे. यामुळे वास्तू शास्त्रात हत्तीच्या जोडीचे वास्तू दोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

पती पत्नीमध्ये वाढतील प्रेम संबध

जर पती-पत्नीमध्ये दूरावा निर्माण झाला असेल किंवा नात्यामध्ये सतत वाद होत असतील तर बेडरुममध्ये हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला वास्तू शास्त्रामध्ये देण्यात आला आहे. बेडरुममध्ये उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवावी. हत्तीची जोडी ठेवताना दोन्ही हत्तीचा चेहरा एकमेकांसमोर असेल याची काळजी घ्यावी.

तसंच बेडरुमचा रंग क्रिम किंवा अगदी फिका असावा. बेडरुममध्ये हत्तीची जोडी ठेवल्याने त्यांच्यातील दुरावा दूर होऊन प्रेमसंबध निर्माण होतील आणि नातं पुन्ही मजबूत होईल.

हे देखिल वाचा-

व्यवसायात यश मिळवण्यासाठी चांदीचे हत्ती

वास्तू शास्त्रामध्ये चांदी आणि हत्ती या दोघांना नकारात्मकता कमी करण्यासाठी महत्वाचं स्थान आहे. घरात किंवा व्यवसायाच यश मिळण्यासाठी उत्तर दिशेला चांदीच्या हत्तीची जोडी ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळतं. अडकलेली काम मार्गी लागतात किंवा प्रमोशन होतं.

घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवण्यासाठी चांदीच्या हत्तीची जोडी घरात उत्तरेला ठेवावी. तसचं घरातील तिजोरीत चांदीचा हत्ती लाल कापडामध्ये बांधून ठेवल्याने उत्पन्नात भर होते आणि घरात भरभराट होते.

आर्थिक स्थिती सुधारेल

घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिजोरीवर लक्ष्मीमातेच्या शेजारी दोन हत्ती उभे असलेला फोटो लावावा. यामुळे घरातील आर्थिक संकट दूर होवून पैशांची भरभराट होईल.

वास्तूशास्त्रानुसार हत्तीच्या जोडीचे इतर फायदे

घरातील लिव्हिंग रुममध्ये पितळ्याच्या हत्तीची जोडी ठेवल्यास घरात शांतता आणि समृद्धी येते.

मुख्य दरवाजाच्या शेजारी हत्तीची जोडी ठेवल्यास घरात सकारात्मकता वाढते तसचं लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.

टीप - ही माहिती वास्तूशास्त्रात सांगितलेल्या गृहितकांवर आधारीत आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT