vastu tips esakal
संस्कृती

Vastu Tips : तुम्हीही जेवल्यावर ताटात हात धुताय? भोगावे लागतील गंभीर परिणाम

ताटात खरखटा हात धुतल्याने देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्या ताटात आपण जेवतो त्यातच हात धुणे ही पद्धत स्टॅंडर्ड लोकांनी पाडली असल्याचे समजले जाते. हि पद्धत अनेकांना वेगळी वाटते. त्यामुळे जेवण झाल्यावर त्यातच हात धुणे वास्तू शास्त्राच्या नियमांविरूद्ध आहे.

शास्त्रात आयुष्यातील प्रत्येक घटनेवर आधारीत काही नियम बनवले गेले आहेत. जेवण तयार करण्यापासून ते जेवण खाण्यापर्यंत नियम सुद्धा वास्तुशास्त्रात आहेत. त्यानुसार जेवल्यानंतर केलेल्या एका चूकीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.तुम्हालाही ही वाईट सवय असेल तर ती लगेच सोडून द्या.

जेवनानंतरची ही सवय बदला

जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची अनेकांना सवय असते. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. ताटात खरखटा हात धुतल्याने देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते. देवी अन्नपूर्णा यांचा कोप माणसाला गरीब बनवू शकते. तसेच,अन्नासाठी आपल्याला दारोदारी भटकायला लागू शकते. त्यामुळे ही सवय लगेच बदला.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किचन आणि जेवण यांच्याबाबतचे काही नियम लक्षात ठेवा.रात्रीच्या वेळी किचन किंवा किचनमध्ये घाणेरडी भांडी ठेवू नका.कट्टा घाण ठेवू नका. स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

नेहमी आंघोळ करून अन्न शिजवावे आणि पहिली चपाती गायीला खाऊ घालावी. तर, शेवटची चपाती कुत्र्याला द्यावी. दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवू नये. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून अन्न खाणे खूप शुभ आहे.अन्न कधीही वाया घालवू नका. ताटात खावे तेवढे घ्या. आणि शक्य होईल तेवढे गरिबांना अन्नदान करा.त्यामुळे त्यांचा आशिर्वादही कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT